ETV Bharat / state

Pune Crime News : पिंपरी चिंचवड शहरात भर दिवसा गोळीबार; तरुणाचा मृत्यू

पिंपरी चिंचवड शहरात भर दिवसा एकावर गोळीबार करण्यात आला आहे. या गोळीबाराच्या घटनेने पिंपरी-चिंचवड हादरले आहे. तर पूर्ववैमनस्यातून हा गोळीबार झाल्याची माहिती मिळत आहे.

Pune Crime News
भर दिवसा तरुणाची केली हत्या
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Aug 23, 2023, 9:49 PM IST

Updated : Aug 23, 2023, 10:57 PM IST

पुणे : पिंपरी चिंचवड शहरात वाढती गुन्हेगारी पोलिसांची डोकेदुखी ठरत आहे. सांगवी परिसरामध्ये भरदिवसा अज्ञात व्यक्तीकडून गोळीबार केल्याची घटना घडली असून, यामध्ये एका तरुणाचा मृत्यू झाला आहे. ही घटना आज दुपारी चार वाजेच्या सुमारास सांगवी परिसरात घडली आहे. सागर शिंदे असे मयत झालेल्या तरुणाचे नाव आहे. तर तो गुन्हेगारी पार्श्वभूमीचा असल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे. सागर शिंदेची गोळी मारून हत्या केल्यामागे पूर्ववैमान्यातून ही घटना घडल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे. या घटनेमुळे सांगवी परिसरामध्ये दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

रक्षक चौकाजवळ गोळीबार : सांगवी पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्रीराम पोळ यांनी दिलेल्या माहितीनुसार, औंध-रावेत बीआरटी मार्गावर असलेल्या रक्षक चौकाजवळ सागर शिंदे आपल्या मित्रांसोबत जात होता. त्यानंतर अज्ञात इसमाकडून गोळीबार करण्यात आला आहे. यामध्ये एक तरुण गंभीर जखमी झाला असून उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाला आहे. तर पोलीस पुढील तपास करत आहेत.

पैशाच्या देवाण घेवाणीवरून वाद : सांगवी पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्रीराम पोळ यांनी दिलेल्या माहितीनुसार, मयत सागर शिंदे आणि आरोपी एकाच कारमधून सांगवी परिसरातील औंध- रावेत बीआरटी मार्गावर असलेल्या रक्षक चौकाजवळ आले. गाडीमध्येच सागर आणि आरोपी योगेश जगताप यांच्यात पैशाच्या देवाण घेवाणीवरून वाद सुरू झाले. एकाच गाडीतून येताना वाद विकोपाला गेला,आणि आरोपी योगेश जगतातने सागरवर पहिली गोळी झाडली. सागर गाडी बाहेर निघून पळू लागला, मात्र तेवढ्यात योजेश जगतापने सागरच्या पाठीत दुसरी गोळी झाडली. त्यात सागरचा मृत्यू झाला. भारत इलेक्ट्रिक कंपनीसमोर हा संपूर्ण प्रकार घडला. त्यानंतर आरोपी योगेश जगताप आपल्या सहकाऱ्यासोबत गाडीतून खाली उतरले. त्यांनी चौकात जाऊन एका दुचाकीस्वाराला बंदुकीचा धाक दाखवत अडवून त्याची दुचाकी घेऊन पळ काढला.

खुनाचा गुन्हा दाखल : सागर शिंदे याच्यावर सन २०१३ मध्ये चतुःश्रृंगी पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल आहे. त्याच वादातून हा प्रकार घडला असल्याचे म्हटले जात आहे. घटनेची माहिती मिळताच पोलीस उपायुक्त काकासाहेब डोळे, सहायक पोलीस आयुक्त विशाल हिरे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्रीराम पौळ यांच्यासह पोलिसांचा फौज फाटा घटनास्थळी दाखल झाला होता. घटनास्थळी पिस्तुलातून झाडण्यात आलेल्या गोळ्यांच्या दोन पुंगळ्या मिळालेल्या आहेत.

अवघ्या काही तासात आरोपी जेरबंद : घटना घडल्यानंतर आरोपी पसार झाले होते. मात्र पिंपरी चिंचवड पोलिसांच्या गुंडा विरोधी पथकाने शिताफीने हत्येच्या गुन्ह्यातील मुख्य सूत्रधार योगेश जगताप याला गुंड विरोधी पथकाने अवघ्या काही तासातच जेरबंद केले आहे. त्याचबरोबर दरोडा पथकाने देखील या गुन्ह्यासंदर्भात एकास ताब्यात घेतले आहे. पुढील तपासात आरोपींबद्दल अधिक महिती समोर येणार असल्याचे देखील पोलीसांनी सांगितले आहे.

शहरात वाढती गुन्हेगारी : शहरात वाढत्या गुन्हेगारीवर अंकुश ठेवण्यात पिंपरी चिंचवड पोलिसांना अपयश येत असल्याचे दिसून येत आहे. गेल्या काही दिवसांपासून शहरात चोरी, चैन स्नाचिंग, वाहनांची तोडफोड, लूटमार, आणि खुनाच्या प्रयत्नासारख्या गुन्ह्यांमध्ये वाढ झाली आहे. भरदिवसा गोळीबाराची घटना घडल्याने पिंपरी चिंचवडकर कितपत सुरक्षित असा प्रश्न उपस्थित होत आहे.

हेही वाचा -

  1. Murder Over Money Dispute: पैशाच्या कारणावरून भररस्त्यात गोळीबार करून साथीदाराचा खून; आरोपीस आठ तासात अटक
  2. Beed Crime News: कन्हेरवाडीत सिगारेटच्या पैशाच्या वादातून अज्ञातांनी केला गोळीबार; हॉटेलमधील सामानाची केली तोडफोड
  3. Police Firing Takli Fata : पोलिसांना टोम्पोखाली चिरडण्याचा प्रयत्न, पोलिसांचा गोळीबार

Last Updated : Aug 23, 2023, 10:57 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.