पुणे : पुण्यातील मार्केट यार्डमध्ये विविध भागांत आग लागण्याचे सत्र सुरूच आहे. आज सकाळी देखील गंगाधाम चौकातील गोडाऊनमध्ये आग लागली. या भीषण आगीमुळे परिसरामध्ये धुराचे मोठे ढग तयार झालेले आहेत. मोठ्या प्रमाणात असल्याने आग विझवण्यासाठी अडचणी येत असल्याचा अग्निशामक धरण कडून सांगण्यात आले आहे. विझविण्याचे शर्तीचे प्रयत्न सध्या चालू आहेत. पुण्यातील मार्केट यार्डजवळ गंगाधाम नावाचा चौक आहे. त्या चौकाच्या जवळ आईमाता मंदिराजवळ एका गोडाऊनमधे आगीची घटना घडली आहे. अग्निशमन दलाचे 11 वाहने घटनास्थळी दाखल झाले आहेत. आग विझवण्याचे काम सुरू आहे.
आगीमुळे प्रचंड नुकसान झाल्याचा अंदाज : या भागांमध्ये विविध वस्तूंचे गोडाऊन आहेत आणि आजूबाजूला इमारती आहेत. रहिवाशी भागामध्ये सुद्धा आगीचे लोन पसरले आहे. त्यामुळे आधीच आग वाढत असल्याने नेमके किती नुकसान होईल? हे आता सांगता येणार नाही. परंतु, आग इतकी भीषण आहे की, आगीमुळे प्रचंड नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज दिसत आहे. यामध्ये विविध प्रकारचे गोडाऊन जसे की बिस्कीट, सिमेंट, मोल्डिंग साहित्य व इतर असे प्राथमिक साहित्य आहे. शेजारी मांडवाचे सामानही पेटले आहे, बाजूला इमारती आहेत.
आजूबाजूच्या परिसरामध्ये धुरांचे लोट : आगीचे तीव्रता खूप मोठी असल्याने आजूबाजूच्या परिसरामध्ये धुरांचे लोट दिसत आहेत. तर आगीचा विस्तार आजूबाजूच्या इमारतीमध्ये झालेला आहे. त्याचबरोबर बाजूला एक मंडपाचे दुकान आहे. त्या मंडपाच्या दुकानांमध्ये सुद्धा ही आग पोहोचले आहे. त्यामुळे आग आणखी वाढली असल्याचे समजत आहे. या आगीमुळे नागरिकांची देखील एकच धांदल उडाली आहे.
हेही वाचा :
Fire In Market Yard : पुण्यातील मार्केट यार्डमधील कागद गोडाऊनला भीषण आग, रद्दीसह वाहने जळून खाक
Market Yard Fire News: पुण्यातील मार्केट यार्डमध्ये पुन्हा अग्नी तांडव; दोघांचा मृत्यू तर एकजण जखमी