पुणे - देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाईट बंद करुन कोरोनावर मात करण्यासाठी दिवे लावण्याचे आवाहन केल्यानंतर आळंदीत चांगला प्रतिसाद मिळाला. मात्र, आळंदीतील वडगाव रोडवरील नियती शिंदे यांच्या तिसऱ्या मजल्यावरील रहात्या घरात शॉटसर्किटमुळे आग लागण्याची घटना घडली. आळंदी नगरपरिषदेच्या अग्निशामक दलाच्या जवानांनी काहीच वेळात आगीवर नियंत्रण मिळवले.
आळंदीमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आवाहनाला चांगला प्रतिसाद मिळाला. सर्वत्र दिपोत्सवाने दिवे लावून कोरोनावर मात करण्याची ताकद मिळो अशी संत ज्ञानेश्वर माऊंलीकडे प्रार्थना केली. यावेळी रात्री लाईट सुरु करताना अचानक शिंदे यांच्या घरात शॉटसर्किट झाला व आगीने पेट घेतला. या आगीमध्ये घरगुती साहित्याचे काही प्रमाणात नुकसान झाले. मात्र, काहीच वेळात आळंदी नगरपरिषदेच्या अग्निशामक दलाने आगीवर नियंत्रण मिळवले.
आळंदीत दिपोत्सवानंतर घरात शॉटसर्किटमुळेआग;घरगुती साहित्याचे नुकसान - dipotsav
आळंदीतील वडगाव रोडवरील नियती शिंदे यांच्या तिसऱ्या मजल्यावरील रहात्या घरात शॉटसर्किटमुळे आग लागण्याची घटना घडली.