पुणे : पुण्यातील सदाशिव पेठेतील भिकारदास मारुतीजवळ एका हॉटेलमध्ये आग लागल्याची घटना (fire broke out in hotel near Bhikardas Maruti) घडली. अग्निशामक दलाचे 3 वाहने दाखल झाले असून घटनास्थळी 3 सिलेंडर बाहेर काढले आहेत. तसेच आगीमधे अडकलेल्या सहा वर्षाच्या मुलीला जवानांनी बाहेर काढले. जखमी अवस्थेत तिला अग्निशमन दलाच्या वाहनातून जवळच्या सूर्या सह्याद्री रुग्णालयात पाठवण्यात आले. पण या घटनेत मुलीचा रुग्णालयात उपचारादरम्यान दुर्दैवी मृत्यू (Pune Hotel Fire) झाला.

मुलीचा दुर्दैवी मृत्यू : इक्रा नईम खान ( वय 6 वर्ष ) असे मृत मुलीचे नाव आहे. तिचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. अग्निशामक दलाला आज सकाळी दहा वाजून 52 मिनिटांनी पुण्यातील सदाशिव पेठ येथील भिकारदास मारुतीजवळ एका हॉटेलमधे आगीची घटना घडली (fire in hotel) आहे, अशी माहिती मिळाली आणि तत्काळ अग्निशामक दलाचे 3 वाहने घटनास्थळी (fire broke out in hotel) पोहचले.

आग आटोक्यात : तात्काळ घटनास्थळी 3 सिलेंडर बाहेर काढले. तसेच आगीमधे अडकलेल्या 06 वर्ष वयाच्या मुलीला जवानांनी बाहेर काढले आणि लगेच जखमी अवस्थेत दलाच्या वाहनातून जवळच्या सूर्या सह्याद्री रुग्णालयात रवाना केल होते. पण या घटनेत या मुलीचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. या घटनेत आग आटोक्यात आली आहे. आग का लागली होती ? याचे कारण मात्र अद्याप स्पष्ट झालेलं (hotel near Bhikardas Maruti in Sadashiv Peth Pune) नाही.