ETV Bharat / state

सोलापुरात टोयोटा शोरुमला आग... 7 ते 8 लाखांचे साहित्य जळून खाक - सोलापूर आग बातमी

गेल्या दोन तीन वर्षांपासून हे शोरुम बंदच होते. पुणे येथील बांधकाम व्यवसायिक दीपक कुलकर्णी यांचे हे शोरुम आहे. शोरुमचे मालक दीपक सखाराम कुलकर्णी फसवणूक गुन्ह्यामध्ये कोर्टात हेलपाटे मारत आहेत. दीपक कुलकर्णी यांचे राज्यभरातील शोरुम बंदच आहेत.

fire-broke-out-at-toyota-showroom-in-solapur
सोलापुरात टोयोटा शोरुमला आग..
author img

By

Published : Jul 30, 2020, 3:58 PM IST

सोलापूर- सोलापूर-पुणे महामार्गावर असलेल्या टोयोटा शोरुमला आज (गुरुवारी) सकाळी शॉर्ट सर्किटने आग लागली. सुमारे सात ते आठ लाख रुपयांचे साहित्य या आगीत जळून खाक झाले असल्याची माहिती फायर ब्रिगेड अधिकारी केदार आवटे यांनी दिली.

सोलापुरात टोयोटा शोरुमला आग..

गेल्या दोन तीन वर्षांपासून हे शोरुम बंदच होते. पुणे येथील बांधकाम व्यवसायिक दीपक कुलकर्णी यांचे हे शोरुम आहे. शोरुमचे मालक दीपक सखाराम कुलकर्णी फसवणूक गुन्ह्यामध्ये कोर्टात हेलपाटे मारत आहेत. दीपक कुलकर्णी यांचे राज्यभरातील शोरुम बंदच आहेत.

सकाळी 9 वाजण्याच्या सुमारास अग्निशामक दलाच्या कार्यालयाला फोन आला. अग्निशामक दलाच्या गाड्या सायरन हॉर्न वाजवत धावत गेल्या. शोरुममध्ये आगीचा मोठा भडका असल्याने फायर ब्रिगेडच्या जवानांनी लांबूनच पाण्याचा फवारा मारुन आगीवर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न केला.

सर्व्हरमध्ये शॉर्ट सर्किटने ही आग लागली अशी प्राथमिक माहिती समोर येत आहे. सर्व बाजूंनी शोरुम बंद असल्याने अग्निशामक दलाच्या जवानांना आग विझविण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करावे लागले. येथे वॉचमन देखील नसल्याने आग मोठ्या प्रमाणात भडकल्यानंतर आजूबाजूच्या शेतकऱ्यांनी व व्यापाऱ्यांनी याची माहिती अग्नीशमन दलाला दिली.

शोरुममधील सर्व्हर रुममध्ये बॅटरी, संगणक,आणि एसीचे वायरिंग होते. या वायरिंगला आग लागली. ही आग एवढी मोठी होती की, 5 बंम्ब पाण्याचे फवारे मारावे लागले. तीन तासांच्या अथक प्रयत्नाने ही आग आटोक्यात आली. या आगीत सुदैवाने कोणत्याही प्रकारची जीवितहानी झाली नाही.

कोट्यवधींच्या मालमत्ते जवळ कमीतकमी एका खासगी सुरक्षा रक्षक नेमावा. जेणेकरुन अशा दुर्घटनामध्ये वेळीच नियंत्रण आणता येईल, असे आवाहन अग्निशामक अधिकारी केदार आवटे यांनी केले आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.