पुणे - जिल्ह्यातील सणसवाडी येथील एन्काई व्हील्स प्रा. लि कंपनीला दुपारच्या सुमारास अचानक भीषण आग लागली. आगीवर नियंत्रण मिळविण्यासाठी अग्निशामक दलाचे प्रयत्न सुरु आहेत. आगीची तीव्रता व धुराचे लोट जास्त असल्याने आगीवर नियंत्रण मिळण्यात अडचण येत आहे.
पीएमआरडीएच्या अग्निशमन दलाच्या गाड्याही घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. लॉकडाऊनमुळे एन्काई व्हील्स प्रा.लि ही कंपनी काही दिवसांपासून बंद होती. त्यामुळे सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र, आगीचे कारण अद्याप अस्पष्ट आहे.
सध्या तापमान जास्त आहे. त्यामुळे, आगीची तीव्रता जास्त असून आग आटोक्यात आणण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले जात आहेत. स्थानिक नागरिक, पोलीस, अग्निशामक दल यांच्या मदतीने आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी प्रयत्न सुरु आहेत.