ETV Bharat / state

शिवसेना आमदार गौतम चाबुकस्वार यांच्याविरोधात अदखलपात्र गुन्हा दाखल - राष्ट्रवादीचे नगरसेवक डब्बू आसवानी

खुनाच्या गुन्ह्यात सहभाग असल्याचा आरोप करून व्हाॅट्सअॅपवर राष्ट्रवादीचे नगरसेवक डब्बू आसवानी यांची बदनामी केल्याप्रकरणी शिवसेना आमदार गौतम चाबुकस्वार यांच्यावर अदखलपात्र गुन्हा पिंपरी पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आला आहे.

आमदार गौतम चाबुकस्वार
author img

By

Published : Aug 10, 2019, 10:56 AM IST

पुणे - जुलै महिन्यात किरकोळ कारणावरुन अपहरण करून हितेश मूलचंदानी या तरुणाचा खून करण्यात आला होता. घटनेप्रकरणी आरोपी जेरबंददेखील झाले आहेत. मात्र, या घटनेने वेगळे वळण घेतले आहे. या खुनाच्या गुन्ह्यात सहभाग असल्याचा आरोप करून व्हाॅट्सअॅपवर राष्ट्रवादीचे नगरसेवक डब्बू आसवानी यांची बदनामी केल्याप्रकरणी शिवसेना आमदार गौतम चाबुकस्वार यांच्यावर अदखलपात्र गुन्हा पिंपरी पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आला आहे.

शिवसेना आमदार गौतम चाबुकस्वार यांच्याविरोधात अदखलपात्र गुन्हा दाखल

याप्रकरणी नगरसेवक डब्बू आसवानी यांनी पिंपरी पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. यावेळी डब्बू आसवानी यांनी पत्रकार परिषद घेऊन याची माहिती दिली. मृत तरुणांच्या वडिलांना माझ्याविरोधात न्यायालयात आणि पोलिसात जबाब द्यावा, असा दबाव आणल्याचा आरोप नगरसेवक डब्बू यांनी केला. शिवाय, आमदार गौतम चाबुकस्वार यांनी व्हाॅट्सअॅपवर खुनात माझा सहभाग असल्याचे पसरवले आहे. याप्रकरणी पिंपरी पोलिसात अदखलपात्र गुन्हा शिवसेना आमदार गौतम चाबुकस्वार यांच्याविरोधात दाखल करण्यात आला आहे.

तीन महिन्यावर विधानसभा निवडणूक येऊन ठेपली आहे. पिंपरीत माझे प्राबल्य असल्याने ते मला या प्रकरणात अडकवत असल्याचे नगरसेवक डब्बू यांनी आरोप केला आहे. दरम्यान, त्यांनी एक ऑडिओ क्लिप सादर केली असून यात खुद्द शिवसेना आमदार गौतम चाबुकस्वार यांचा आवाज आहे. त्यात डब्बू आसवानी हे पोलिसांसोबत घेऊन तुम्हाला फसवत असल्याचे म्हटले आहे.

या प्रकरणी शिवसेना आमदार गौतम चाबुकस्वार यांच्याशी संपर्क केला असता ते म्हणाले, संबंधित क्लिपमधील माझा आवाज नाही, माझा आवाज कोणीही ओळखेल. पिंपरीत झालेल्या आंदोलनात सहभाग घेतला होता. त्यानंतर पिंपरी विधानसभेचा प्रतिनिधी म्हणून त्यांच्या घरी गेलो होतो. तेव्हा, कार्यकर्ते सोबत होते, त्यानंतर खासदारांसोबत त्यांच्या घरी गेलो होतो. त्यानंतर त्यांचे माझे संभाषण झालेले नाही. जे सत्य असे ते बाहेर येईल, असे ते यावेळी म्हणाले.

Intro:mh_pun_03_shivsena_mla_av_mhc10002Body:mh_pun_03_shivsena_mla_av_mhc10002

Anchor:- जुलै महिन्यात किरकोळ कारणावरून अपहरण करून हितेश मूलचंदानी या तरुणाचा खून करण्यात आला होता. घटने प्रकरणी आरोपी जेरबंद देखील झाले आहेत. मात्र, या घटनेने वेगळे वळण घेतले असून या खुनाच्या गुन्ह्यात सहभाग असल्याचा आरोप करून व्हाट्सऍपवर राष्ट्रवादीचे नगर सेवक डब्बू आसवानी यांची बदनामी केल्या प्रकरणी शिवसेना आमदार गौतम चाबुकस्वार यांच्यावर अदखलपात्र गुन्हा पिंपरी पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी नगरसेवक डब्बू आसवानी यांनी पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. यावेळी डब्बू आसवानी यांनी पत्रकार परिषद घेऊन याची माहिती दिली. मयत तरुणांच्या वडिलांना माझ्या विरोधात न्यायालयात आणि पोलिसात जबाब द्यावा असा दबाव आणला जात आल्याचा आरोप नगरसेवक डब्बू यांनी केला. शिवाय, आमदार गौतम चाबुकस्वार यांनी व्हाट्सऍप वर खुनात माझा सहभाग असल्याचे पसरविले आहे. याप्रकरणी पिंपरी पोलिसात अदखलपात्र गुन्हा शिवसेना आमदार गौतम चाबुकस्वार यांच्या विरोधात दाखल करण्यात आला आहे. तीन महिन्यावर विधानसभा निवडणूक येऊन ठेपली आहे. पिंपरीत माझे प्राबल्य असल्याने ते मला या प्रकरणात अडकवत असल्याचे नगरसेवक डब्बू यांनी आरोप केलाय. दरम्यान, त्यांनी एक ऑडिओ क्लिप सादर केली असून यात खुद्द शिवसेना आमदार गौतम चाबुकस्वार यांचा आवाज आहे. त्यात डब्बू आसवाणी हे पोलिसाना सोबत घेऊन तुम्हाला फसवत असल्याचे म्हटले आहे. दरम्यान, या प्रकरणी शिवसेना आमदार गौतम चाबुकस्वार यांच्याशी संपर्क केला असता ते म्हणाले, संबंधित क्लिपमधील माझा आवाज नाही, माझा आवाज कोणीही ओळखेल. पिंपरीत झालेल्या आंदोलन सहभाग घेतला होता. त्यानंतर पिंपरी विधानसभेचा प्रतिनिधी म्हणून त्यांच्या घरी गेलो होतो. तेव्हा, कार्यकर्ते सोबत होते, त्यानंतर खासदारांसोबत त्यांच्या घरी गेलो होतो. त्यानंतर त्यांच माझं संभाषण झालेले नाही. जे सत्य असे ते बाहेर येईलConclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.