पुणे - सार्वजनिक कार्यक्रमांवर बंदी असताना शिरूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापतीपदाची निवडणूक प्रक्रिया पार पडल्यानंतर, नवनिर्वाचित सभापती शंकर जांभळकर यांनी कार्यकर्त्यांसह करंदी गावात सनई ताशाच्या गजरात मिरवणूक काढली. त्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांच्या नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी सभापती शंकर जांभळकर यांच्यासह 10 ते 15 जणांवर शिक्रापूर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. याबाबतची माहिती पोलीस निरिक्षक सदाशिव शेलार यांनी दिली.
लग्न सभारंभ, सार्वजनिक कार्यक्रमांना काही नियम अटींवर परवानगी दिली जाते. मात्र, सध्या सर्रास जिल्हाधिकारी यांच्या नियमांचे वारंवार उल्लंघन केले जात असुन, शिरुर तालुक्यात आठवड्यात वेगवेगळे तीन गुन्हे दाखल झाले आहेत.