ETV Bharat / state

Tomato Price Controversy: टोमॅटोवरून ग्राहक आणि विक्रेते आपापसात भिडले; पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

पुण्यात चक्क टोमॅटोच्या वाढलेल्या दरामुळे भाजी विक्रेता आणि ग्राहक यांच्यात हाणामारी होऊन जखमी करण्याचा प्रकार वडगाव शेरी भाजी मार्केटमध्ये घडला आहे. याबाबत गोपाल गोविंद ढेपे (वय ४२, रा. गलांडेनगर, वडगाव शेरी) यांनी चंदननगर पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यानुसार चंदननगर पोलिसांनी अनिल गायकवाड (रा. वडगाव शेरी) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

Tomato Price Controversy
टमाटर दर
author img

By

Published : Jul 9, 2023, 6:15 PM IST

पुणे : गेल्या काही दिवसांपासून देशासह राज्यात टोमॅटोचे भाव गगनाला भिडले असून 80 ते 100 रु. किलो भावाने सध्या टोमॅटो विकले जात आहेत. गृहिणी आता टोमॅटोचा वापर जपून करताना पाहायला मिळत आहे. सध्या घराघरात टोमॅटोचीच चर्चा पाहायला मिळत आहे.

टोमॅटोच्या दरावरून जुंपली: याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रार गोपाल ढेपे हे भाजी आणण्यासाठी वडगाव शेरी येथील भाजी मार्केटमध्ये गेले होते. त्यांनी भाजी विक्रेते अनिल गायकवाड यांनी टोमॅटोचा भाव विचारला. त्यांनी टोमॅटो २० रुपये पावशेर असल्याचे सांगितले. त्यावर तक्रारदार यांनी त्यांना खूप महाग आहेत असे उत्तर दिले. त्यावरुन अनिल गायकवाड यांनी तक्रारदारांनी शिविगाळ केली. तक्रारदाचे तोंडावर बुक्कीने मारहाण करून वजनकाट्यातील वजन हातात घेऊन त्यांच्या उजव्या गालावर मारून जखमी केले, असे तक्रारदारांनी नमूद केले आहे. याबाबत अधिक तपास पोलीस करत आहे.

भाजीपाल्याच्या दरातही वाढ : सध्या गेल्या काही दिवसांपासून टोमॅटोचे दर हे वाढले आहेत. बाजारात 80 ते 100 रुपये किलो दराने टमाटे विक्री केली जात आहे. यंदा टोमॅटोचे कमी उत्पादन झाल्याने टोमॅटोला मागणी वाढली आहे. यासह भाजीपाल्यांचे दरही वाढलेले पाहायला मिळत आहे.

टोमॅटोने ओलांडली शंभरी : देशातील अनेक भागात टोमॅटोच्या दराने शंभरी ओलांडली आहे. नवी मुंबई वाशीतील मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीत (एपीएमसी) घाऊक बाजारात टोमॅटोचे भाव ६० ते ८० रुपये किलोपर्यंत पोहोचले आहेत. किरकोळ बाजारात टोमॅटोचे दर 100 ते 120 रुपये दराने विकले जात आहेत. ही दर वाढ दिल्ली-एनसीआर बाजारासह उत्तर प्रदेश महाराष्ट्र, बिहार, झारखंड आणि मध्य प्रदेश राज्यांमध्ये पाहायला मिळत आहे. गेल्या आठवड्यात जे टोमॅटो दर्जानुसार ३० ते ४० रुपयांनी बाजारात विकले जात होते, ते आता ७० ते ९० रुपये दराने विकले जात आहेत. तर काही ठिकाणी १०० रुपये किलोच्या आसपास दर पोहोचले आहेत. बिपरजॉय वादळामुळे झालेल्या पावसाचा राज्यातील टोमॅटो पिकावर परिणाम झाला आहे. बिपरजॉय वादळामचा फटका गुजरातमधील टोमॅटो पिकाला चांगलाच बसला आहे. तर तिकडे बिहार आणि पश्चिम बंगालमधील कडाक्याच्या उष्णतेमुळे टोमॅटोच्या पिकावर परिणाम झाल्याने आवक घटली आहे. देशातील अनेक राज्यांतील मंडईंमध्ये टोमॅटोची आवक घटली, त्यामुळे दर गगनाला भिडले आहेत. दुसरीकडे पावसाला सुरुवात झाल्याने टोमॅटो पिकावर परिणाम झाल्याचे समजते. दरम्यान, इतर शेतमालाला अधिक भाव मिळाल्याने, शेतकऱ्यांनी टोमॅटो पिकाकडे दुर्लक्ष केल्याचेही कारण पाहायला मिळते आहे.

हेही वाचा:

  1. Tomato Free With Mobile : दुकानदाराची अनोखी ऑफर; स्मार्टफोन खरेदीवर 2 किलो टोमॅटो फ्री!
  2. Tomato prices News: किलोभर टोमॅटोने गाठला चिकनचा दर, गृहिणींचे कोसळले बजेट
  3. Tomato Price : टोमॅटोचे दर ऐकून बसेल धक्का, सर्वसामान्यांचा खिसा होतोय रिकामा

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.