पुणे - पुण्यात बापलेकाची ठेचून हत्या (Father and Son Murder) केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. पुण्यातील लोणीकंद (Lonikand Pune) परिसरात आज सायंकाळी ही हत्या झाली असून घटनास्थळी लोणीकंद पोलीस (Lonikand Police) दाखल झाले आहेत.
- काय आहे प्रकरण?
सनी कुमार शिंदे (वय 22) आणि कुमार शिंदे (वय 55) अशी खून झालेल्या दोघा बापलेकाची नावे आहेत. यापूर्वी एका खून प्रकरणात सनी शिंदे हा आधीच कारागृहात होता. तीन महिन्यांपूर्वीच तो जामिनावर सुटून बाहेर आला होता.
दरम्यान, आज सायंकाळी सात वाजण्याच्या सुमारास अज्ञात हल्लेखोरांनी सनीला गाठले आणि कोयता आणि दगडाने मारहाण करू लागले. त्याचवेळी कुमार शिंदे हे मुलाला वाचवण्यासाठी मध्ये गेले असता आरोपींनी त्यांच्यावर देखील हल्ला केला.
- आरोपींची ओळख पटली -
या हल्ल्यात सनी शिंदे आणि कुमार शिंदे या दोघांचाही मृत्यू झाला आहे. या प्रकरणात आरोपींची नावे कळली असुन आरोपींचा शोध सुरू असल्याची माहिती लोणीकंद पोलिसांनी दिली आहे.