ETV Bharat / state

Pune Crime News: पुण्यात बापलेकीच्या नात्याला काळीमा फासणारी घटना; पाच वर्षापासून वडिलांचा मुलीवर लैंगिक अत्याचार - लैंगिक गुन्ह्यांपासून बालकांचे संरक्षण

पुणे शहरात दिवसेंदिवस लैंगिक अत्याचाराचे प्रमाण वाढत आहेत. विशेष म्हणजे कुटुंबाकडूनच हे प्रकार वाढत आहेत. असाच एक प्रकार येरवडा भागामध्ये समोर आला आहे. गेल्या पाच वर्षांपासून वडील आणि सावत्र आईकडून लैंगिक अत्याचार होत असल्याचा आरोप एका 17 वर्षीय तरुणीने केला आहे. येरवडा पोलिसांकडून वडिलांना अटक करण्यात आली आहे. वडिलांकडून असा प्रकार घडला आहे. त्यामुळे नात्यांवर, सुरक्षिततेवर प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे.

Pune Crime News
वडिलांचा मुलीवर लैंगिक अत्याचार
author img

By

Published : Mar 21, 2023, 8:33 AM IST

पुणे : पुण्यात नात्याला काळीमा फासणारी घटना घडली आहे. आपण लैंगिक अत्याचाराच्या घटना नेहमीच ऐकत असतो. परंतु या घटनेने परिसरात खळबळ माजली आहे. जन्मदात्या पित्यानेच त्याच्या 17 वर्षीय मुलीवर वारंवार बलात्कार केल्याची धक्कादायक घटना येरवड्यामध्ये घडली आहे. या तरुणीच्या वडिलांनी तिला बारावीच्या परीक्षेपासून दूर ठेवण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर ती मैत्रिणीकडे शिफ्ट झाली. त्यावेळेस त्यांनी मित्राला तिची व्यथा सांगितली. मित्राने सल्ला सांगून पोलिसांमध्ये तक्रार द्यायला सांगितले. या प्रकरणी तिने रविवारी तक्रार दाखल केल्यानंतर पोलिसांनी अटक केल्याचे येरवडा पोलीस स्टेशनचे निरीक्षक उत्तम चाकोरे यांनी सांगितले.

शारीरिक अत्याचार आणि विनयभंग : मुलीने तक्रारीत म्हटले आहे की, तिचे वडील शारीरिक अत्याचार आणि विनयभंग करत होते. त्याची दुसरी पत्नी त्याला त्याच्या वाईट कामात साथ देत होती. काही दिवसापूर्वी ती तिच्या बेडरूममध्ये तिच्या परीक्षेची तयारी करत होती. तेव्हा तिच्या वडिलांनी तिला अभ्यासासाठी फटकारले. तिला घरातील कामांवर लक्ष केंद्रित करण्यास सांगितले. जेव्हा तिने परीक्षेसाठी अभ्यास करू द्या, अशी विनंती केली तेव्हा वडिलांनी तिचे हॉल तिकीट फाडले. लैंगिक गुन्ह्यांपासून बालकांचे संरक्षण कायदा भारत सरकारने २०१२ साली तयार केला आहे.

वडिलांपासून विभक्त झाली : पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या घटनेमुळे तरुणी खूप व्यथित झाली होती. तिने तिच्या मैत्रिणीच्या घरी जाऊन घडलेला प्रकार सांगितला. तिच्या मैत्रिणीने तिला सांगितले की, तिच्याकडे हॉल तिकिटाची छायाप्रत असल्याने ती अजूनही परीक्षा देऊ शकते. त्यानंतर पीडितेने तिच्या त्रासाबद्दल खुलासा केला. पीडितेची आई पाच वर्षांची असताना तिच्या वडिलांपासून विभक्त झाली. तिच्या वडिलांनी नंतर दुसरे लग्न केले.

गैरवर्तन करतात : मुलीने म्हटले आहे की, ती 12 वर्षांची असताना तिच्या वडिलांनी तिच्यासमोर स्वत:ला उघड केले. तिने ही बाब तिच्या सावत्र आईच्या निदर्शनास आणून दिली. मात्र, तिने पतीला साथ दिली. तिने तिचे कपडेही काढले आणि वडिलांनी तिच्यावर बलात्कार करण्याचा प्रयत्न केला. तिचे वडील दारू पिणारे असून अनेकदा तिच्याशी गैरवर्तन करतात. आरोपी वडिलांना आयपीसीच्या कलम ३५४ आणि लैंगिक गुन्ह्यांपासून मुलांचे संरक्षण (पोक्सो) कायद्याच्या संबंधित कलमांतर्गत अटक करण्यात आली आहे. माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे. डिसेंबरमध्ये देखील कोंढावा भागात अशीच घटना घडली होती. विशेष म्हणजे लैंगिक अत्याचार करण्यासाठी पीडित मुलीची आई आणि आईचा मित्र हे सर्व आरोपीला मदत करत होते.

हेही वाचा : Bengal Crime News: महिलेचे भाडेकरुबरोबर प्रेमंसबंध, अडसर ठरणाऱ्या आईने केली मुलीची हत्या

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.