ETV Bharat / state

संतापजनक..! बापाचा स्वत:च्या मुलीवर 7 वर्षे अत्याचार - संतापजनक..! बापाचा स्वत:च्या मुलीवर 7 वर्षे अत्याचार

स्वत:च्या मुलीशी ७ वर्षे लैंगिक शोषण केल्याचा धक्कादायक प्रकार बारामती शहरात उघडकीस आला आहे. या प्रकरणी पीडितेने शहर पोलीस ठाण्यात तक्रार दिली असून पोलिसांनी नराधम पित्याविरोधात बलात्कार आणि बाललैंगिक अत्याचार कायद्यान्वे गुन्हा दाखल केला असून ३ दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.

बारामती
बारामती
author img

By

Published : Apr 21, 2020, 5:56 PM IST

बारामती - बापानेच स्वत:च्या मुलीशी ७ वर्षे लैंगिक शोषण केल्याचा धक्कादायक प्रकार बारामती शहरात उघडकीस आला आहे. या प्रकरणी पीडितेने शहर पोलीस ठाण्यात तक्रार दिली असून पोलिसांनी नराधम पित्याविरोधात बलात्कार आणि बाललैंगिक अत्याचार कायद्यान्वे गुन्हा दाखल केला असून ३ दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, २० वर्षीय पीडितेने शहर पोलीस ठाण्यात तक्रार दिली. पीडित तरुणी १३ वर्षांची असल्यापासून बापाकडून तिच्यावर अत्याचार केला जात होता. दाखल तक्रारीनुसार १३ डिसेंबर २०१३ ते १९ मार्च २०२० या काळात राहत्या घरातच हे दृष्टकृत्य घडत होते. या मुलीला २०१३ साली मासिक पाळी सुरू झाली होती. त्यामुळे तिला त्रास होऊ लागला होता. याचा फायदा घेत तिच्या बापाने तिच्याजवळ जात तुला मासिक पाळीमुळे त्रास होत आहे का?, असे विचारून माझ्याकडे त्यावर एक उपाय आहे, असे म्हणून त्याने स्वत:च्याच मुलीशी जबरदस्तीने शारीरिक संबंध ठेवले. ती लहान असल्याने वडिलांना घाबरत होती आणि वडिलांनी धमकी दिल्यामुळे तिने याबाबत वाच्यता केली नाही. याचाच गैरफायदा घेत नराधम बापाने सलग ७ वर्षे इच्छेविरुध्द तिच्याशी शारीरिक संबंध ठेवले.

बापाचा सततचा त्रास असह्य होऊ लागल्याने पीडित मुलीने आई व इतर नातेवाईकांना या प्रकाराबाबत कल्पना देत पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलिसांनी नराधम बापाविरोधात गुन्हा दाखल केला असून त्याला अटक केली आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.