ETV Bharat / state

धक्कादायक..दारुड्या मुलानं केला वडिलांचा खून - मुलाने केला वडिलांचा खून

दारुड्या मुलाने वडिलांचा खून केल्याची घटना रविवारी रात्री आठच्या सुमारास चिंचवड येथील वेताळनगरात घडली. गेल्या काही दिवसांपासून पिंपरी-चिंचवड शहरात तोडफोडीच्या घटनांमध्येही वाढ झाली आहे.

पुणे
पुणे
author img

By

Published : Nov 2, 2020, 1:23 PM IST

पुणे - दारुड्या मुलाने वडिलांच्या डोक्यात पाण्याचा भरलेला हंडा घालून खून केल्याची घटना घडली. ही घटना रविवारी रात्री आठच्या सुमारास चिंचवड येथील वेताळनगरात घडली. तानाजी सदबा सोलंकर (५५) असे मृत व्यक्तीचे नाव आहे.

संजय तानाजी सोलंकर (30) असे संशयीत मुलाचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी संजय रविवारी सायंकाळी दारु पिऊन घरी आला. त्यावेळी तानाजी आणि संजय यांच्यात घरगुती कारणावरून वाद झाला. या वादातून संजयने पाण्याने भरलेला हंडा तानाजींच्या डोक्यात घातला. यामुळे तानाजी गंभीर जखमी झाले. शेजाऱ्यांनी वाद सोडवत, तानाजी यांना नजीकच्या रुग्णालयात दाखल केले. मात्र, उपचारा दरम्यान त्यांचा मृत्यू झाला.

गेल्या काही दिवसांपासून पिंपरी-चिंचवड शहरात तोडफोडीच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. आता खुनाच्या घटनेची त्यात भर पडली. त्यामुळे गुन्हेगार हे पिंपरी-चिंचवड पोलिसांना आव्हान तर देत नाहीत ना, असा प्रश्न उपस्थित होत आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.