ETV Bharat / state

मावळमध्ये बैलपोळ्यानिमित्त बैलगाडा शर्यत सुरू करण्याची शेतकऱ्यांची मागणी - पुणे जिल्हा बातमी

मावळ परिसरातील बंद केलेली बैलगाडा शर्यत पुन्हा सुरू करावी, अशी मागणी येथील शेतकऱ्यांनी केली आहे.

बोलताना शेतकरी
बोलताना शेतकरी
author img

By

Published : Sep 17, 2020, 8:29 PM IST

मावळ (पुणे) - कोरोनाचा पार्श्वभूमीवर यावर्षीचा बैलपोळा हा सण शेतकऱ्यांनी अत्यंत साध्या पद्धतीने साजरा केला आहे. गर्दी न करता बळीराजाने हा सण साजरा केला. दरम्यान, या निमित्ताने शेतकरी आणि बैलगाडा मालकांनी बैलगाडा शर्यत पुन्हा सुरू करावी, अशी मागणी केंद्र आणि राज्यसरकारकडे केली आहे.

बोलताना शेतकरी
पुणे जिल्ह्यातील मावळ परिसरातील शेतकऱ्यांनी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यावर्षी बैलपोळा हा अत्यंत साध्या पद्धतीने साजरा केला आहे. दरवर्षी हलगी, डीजे लावून बैल जोडी गावातून मिरवली जाते. मात्र, यावर्षी कोरोनाचा संकट अवघ्या जगावर असून काही निर्बंध प्रशासनाकडून घालण्यात आल्याने बैल जोडीला गावात न मिरवता घरापुढेच भंडारा उधळून हा सण साजरा करण्यात आला आहे. बैलपोळा सण शेतकरी आणि बैलगाडा मालकांसाठी अत्यंत महत्वाचा मानला जातो. गेल्या काही वर्षांपासून बैलगाडा शर्यत बंद आहे. ती, लवकरात लवकर सुरू करावी, अशी मागणी शेतकरी व बैलगाडा मालकांनी केली.हेही वाचा -राष्ट्रवादी युवक काँग्रेसने केला पंतप्रधान मोदींचा वाढदिवस 'राष्ट्रीय बेरोजगार दिन' म्हणून साजरा

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.