ETV Bharat / state

Ajit Pawar Video : भर कार्यक्रमात प्रांताधिकारी पाच लाख रुपये मागत असल्याची अजित पवारांकडे शेतकऱ्याने केली तक्रार; पवार म्हणाले,

अजित पवार बारामतीच्या दौऱ्यावर ( Ajit Pawar on Baramati Tour ) आहेत. उपमुख्यमंत्री अजित पवार व्यासपीठावर बोलत असताना एका शेतकऱ्याने भरसभेत प्रांताधिकारी पाच लाख रुपये मागत असल्याची तक्रार करत गंभीर आरोप ( Farmers complained to Ajit Pawar ) केला. अचानक झालेल्या या आरोपांमुळे सभा स्तब्ध झाली.

Ajit Pawar Video
अजित पवार
author img

By

Published : May 7, 2022, 5:49 PM IST

बारामती - अजित पवार हे बारामतीच्या दौऱ्यावर ( Ajit Pawar on Baramati Tour ) आहेत. दौऱ्यादरम्यान त्यांनी तालुक्यातील काटेवाडी येथे एक तास राष्ट्रवादीसाठी या उपक्रमांतर्गत कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी एका शेतकऱ्याने अजित पवार यांच्या थेट प्रांतधिकारी पैस मागत असल्याची तक्रार ( Farmers complained to Ajit Pawar ) केली.

बारामतीत दौऱ्यातील आयोजित कार्यक्रमात उपमुख्यमंत्री अजित पवार व्यासपीठावर बोलत असताना एका शेतकऱ्याने प्रांताधिकार्‍यांनी भूसंपादनाच्या कामात पोटहिस्से करून दिले नाहीत. मुद्दाम अडथळे आणले. आम्हाला पाच लाख रुपये मागितले, असा गंभीर आरोप केला. अचानक झालेल्या या आरोपांमुळे सभा स्तब्ध झाली. व्यासपीठा लगतच उभे असणाऱ्या प्रांताधिकार्‍यांनी संबंधित क्षेत्रातील वाटपच अद्याप झालेले नाही, भूसंपादनाची प्रक्रिया अद्याप झालेली नाही. त्यामुळे हा आरोप चुकीचा असल्याचे स्पष्टीकरण त्यांनी पवार यांच्याकडे लागलीच दिले.

उपमुख्यमंत्री अजित पवार आज (दि.7) बारामतीच्या दौऱ्यावर आहेत. शहरातील कार्यक्रम आटोपून ते काटेवाडीत एक तास राष्ट्रवादीसाठी या उपक्रमासाठी आले होते. यावेळी त्यांचे भाषण सुरु असतानाच श्रोत्यांमध्ये बसलेल्या काटेवाडीतील अजित देवकाते या शेतकऱ्याने अचानक उठत ही गंभीर तक्रार केली. प्रांताधिकारी तात्काळ पुढे सरसावले आणि त्यांनी पवार यांच्याकडे स्पष्टीकरण दिले. त्यावर उपमुख्यमंत्री पवार यांनी देवकाते यांची समजूत घालण्याचा प्रयत्न केला. अजित,तुझे आणि माझे नाव एकच आहे. तरी मी एवढा संयमीपणे बोलतो आहे. तु देखील शांतपणे बोल, तुझे जे काही काम असेल ती मार्गी लावतो, असे म्हणत पवार यांनी देवकाते यांची समजूत घालण्याचा प्रयत्न केला. दरम्यान अचानक घडलेल्या या प्रकारामुळे सभा स्तब्ध झाली.

हेही वाचा - Satara Gelatin Blast : जिलेटीन स्फोटाने सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाचा बफर झोन हादरला, जिलेटीनच्या 115 कांड्या जप्त

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.