ETV Bharat / state

आशादायक; चक्रीवादळाच्या नुकसानीनंतरही 'या' शेतकरी महिलेने घेतली उभारी - पुणे शेतीविषयक बातमी

देवतोरणे गावातील उषा आवारी या महिलेने 29 गुंठे शेतावर 35 लाख रुपये कर्ज काढून गुलाबाच्या फुलांची शेती करण्यासाठी पॉलिहाऊस उभारले. उषाने घरातीलच नातेवाईकांच्या मदतीने पॉलिहाऊसची उभारणी केली. दिवस-रात्र मेहनत करून उभारलेले पॉलिहाऊस कोरोनाच्या महामारीच्या संकटात सापडले. त्यातच वातावरणातील बदलामुळे फुलांना रोगराईने ग्रासले. मात्र, तरीही उषाने जिद्दीने पुन्हा पॉलिहाऊस उभे केले आहे.

polyhouse
गुलाब शेतीसाठी महिलेने उभारलेले पॉलिहाऊस
author img

By

Published : Jul 2, 2020, 3:23 PM IST

Updated : Jul 2, 2020, 7:00 PM IST

पुणे - ग्रामीण भागात कोरोनाच्या महामारीमुळे सार्वजनिक कार्यक्रम, लग्न समारंभ, मंदिर बंद असल्याने पॉलिहाऊसमध्ये तयार झालेला माल फेकून देण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली. त्यातच चक्रीवादळात शेतीसह पॉलिहाऊसचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. मोठ्या भांडवली खर्चातून उभारलेले पॉलिहाऊस आर्थिक संकटात सापडले आहेत. या संकटातूनही उभारी घेऊन खेड तालुक्यातील देवतोरणे गावातील उषा आवारी या महिलेने कर्जाचा डोंगर डोक्यावर घेऊन पुन्हा उभारी घेतली आहे.

आशादायक; चक्रीवादळाच्या नुकसानीनंतरही 'या' शेतकरी महिलेने घेतली उभारी

खेड तालुक्यातील देवतोरणे गावातील उषा आवारी या महिलेने 29 गुंठे शेतावर 35 लाख रुपये कर्ज काढून लाल-पिवळ्या व गुलाबी रंगाच्या गुलाबाच्या फुलांची शेती करण्यासाठी पॉलिहाऊस उभारले. उषाने घरातीलच नातेवाईकांच्या मदतीने पॉलिहाऊसची उभारणी केली. दिवस-रात्र मेहनत करून उभारलेले पॉलिहाऊस कोरोनाच्या महामारीच्या संकटात सापडले. त्यातच वातावरणातील बदलामुळे फुलांना रोगराईने ग्रासले. अशा संकटाचा सामना करत असताना चक्रीवादळाने संपूर्ण पॉलिहाऊस उद्ध्वस्त झाले. अशा संकटाच्या विवंचनेत असताना नातेवाईक मित्रमंडळी यांच्या मदतीने पैशाची उभारणी केली. पुन्हा नव्याने खचून न जाता पॉलिहाऊस उभे केले आहे.

संसाराचा गाडा हाकत असताना महिलेची मदत ही कौतुकास्पद असते. मात्र, ही महिला संसाराचा गाडा हाकत असतानाही शेतीला जोड व्यवसाय म्हणून उभारलेल्या पॉलिहाऊसच्या संपूर्ण कामाची जबाबदारी स्वतःच्या खांद्यावर घेऊन पुढे चालली आहे. पूर्वीचे कर्ज आणि नव्याने नातेवाईक व मित्रमंडळीकडून उभारलेले कर्ज डोक्यावर घेऊन ही महिला पॉलिहाऊसमध्ये मेहनत घेत आहे.

कोरोनाच्या महामारीमुळे झालेले लॉकडाऊन आणि त्यानंतर चक्रीवादळ अशा दुहेरी संकटात पॉलिहाऊसचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. या नुकसानीचे पंचनामे होऊनही शासनाची अद्याप कुठलीही मदत मिळाली नाही. सध्या पॉलिहाऊस शेतकरी कर्जात बुडाला आहे. तरीही असे संकट डोक्यावर घेऊन उषा आवारी ही महिला पुन्हा उभारी घेते, ही बाब कौतुकास्पद आहे.

Last Updated : Jul 2, 2020, 7:00 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.