पुणे : तोतया आयएएस अधिकाऱ्याचा पर्दाफाश झाला आहे. पुणे पोलिसांनी तोतया आयएएस अधिकाऱ्याला अटक करून चतुर्श्रुंगी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
वासुदेव निवृत्ती तायडे (वय ५४ रा. फ्लॅट न ३३६, रानवार रोहाऊस तळेगाव दाभाडे,) असा त्या तोतया आयएएस अधिकाऱ्याचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेल्या महितीनुसार, औंध पुणे बाॅर्डर लेस वर्ल्ड फाऊन्डेशन या संस्थेच्या कार्यक्रमामधे जम्मू काश्मीरला मदतीसाठी पाठविण्याकरीता ॲम्बुलन्सचा लोकार्पण साेहळा आयाेजित करण्यात आला हाेता. या कार्यक्रमाचे आयोजक वेळी विरेन शहा , सुहास कदम, पी के गुप्ता व इतर ट्रस्टी व सदस्य असे हजर हाेते. या कार्यक्रमामध्ये पाहुणे म्हणुन आलेल्या व्यक्तीने आपले नाव डाॅ. विनय देव असे सांगितले. तसेच स्वत: आयएएस असल्याचे सांगितले. पंतप्रधान कार्यालयालयात सचिव पदावर असून तिथे गाेपनीय काम करीत असल्याची खोटी माहिती कार्यक्रमातील उपस्थितांना दिले. मात्र दिलेली माहिती ही संशयास्पद वाटल्याने संस्थेचे पदाधिकारी यांनी अधिक विचारणा केली. तेव्हा माहिती सांगणाऱ्याबदद्लच्या आयएएस पदाबाबत संशय अधिक वाढला.
राहत्या घरातून घेतले ताब्यात- संस्थेच्या लोकांनी या प्रकरणी पोलिसात तक्रार दिली. युनिट १ च्या पोलीस अधिकाऱ्यांनी बुधवारी आरोपीला तळेगाव येथे राहत्या घरातून ताब्यात घेतले. त्यानंतर त्याची कसून चौकशी केली. तेव्हा त्याने आपले नाव वासुदेव निवृत्ती तायडे असे सांगितले. त्याचे विरूध्द पोलीस फौजदार मखरे यांनी दिलेल्या तक्रारीवरून भादंवि कलम 419,170 अन्वये चतुर्श्रुंगी पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पुण्यात नुकतेच आढळले होते तोतया पत्रकार- नुकतेच खंडणीखोर तोतया पत्रकराने पोलिसांच्या अंगावर गाडी घालून जिवे मारण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी फिल्मीस्टाईलने गोळीबार करत आरोपीला अटक करून त्याचा डाव उधळला होता. या प्रकरणी पोलिसांनी महेश सौदागर हनमे रा.सोलापूर याला पोलिसांनी अटक केली आहे. या प्रकरणी संतोष थोरात यांनी फिर्याद दिली आरोपीने रोख व ऑनलाईन स्वरुपात एकूण ३ लाख ८० हजार रुपये घेवून तक्रारदाराला हॉटेल स्वराज, मोहोळ जि.सोलापूर येथे बोलावले. ५ कोटी रुपयांची मागणी करून तक्रारदाराला व त्याच्या कुटुंबास जिवे मारण्याची धमकी दिली.
हेही वाचा-