ETV Bharat / state

Fake Army Officer Arrested: 'त्या' तोतया लष्करी अधिकाऱ्याचे अशाप्रकारे फुटले बिंग; थेट १५ ऑगस्टच्या कार्यक्रमातही झाला होता सहभागी - truth about that fake army officer

Fake Army Officer Arrested : पुण्याच्या रेल्वेस्थानकावर एका तोतया सैन्यदलाच्या अधिकाऱ्याला अटक करण्यात आलीय. निरज विक्रम विश्वकर्मा (वय २०, रा. लटेरा, उत्तर प्रदेश) (Neeraj Vishvakarma) असे या अटक करण्यात आलेल्या तोतया अधिकाऱ्याचे नाव आहे. (Pass free entry to Red Fort) तो मुळचा उत्तरप्रदेशचा रहिवाशी होता. गुप्त माहितीच्या आधारे ही कारवाई करण्यात आली.

Fake Army Officer Arrested
तोतया लष्करी अधिकारी जेरबंद
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Sep 3, 2023, 5:15 PM IST

पुणे Fake Army Officer Arrested: पुणे रेल्वे स्थानकाच्या प्लॅटफॉर्म ६ वर सैन्यदलाच्या गणवेशात फिरणाऱ्या तोतया अधिकाऱ्याला रेल्वे राखीव दलाने अटक केलीय. (Neeraj Vishvakarma) धक्कादायक बाब म्हणजे, या तोतया अधिकाऱ्याने सैन्यदलाच्या गणवेशात १५ ऑगस्ट २०२३ रोजी लाल किल्ल्यावर पासाशिवाय प्रवेश केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय. (Pass free entry to Red Fort)

रेल्वे प्लॅटफॉर्मवर संशयितरीत्या फिरताना अटक: याबाबत अधिक माहिती अशी की, रेल्वे राखीव दलाचे पी के यादव, अशोक चांदूरकर यांना पुणे रेल्वे स्थानक येथे एक सैन्यदलाचा अधिकारी प्लॅटफॉर्म क्रमांक ६ वर संशयितरित्या फिरत असल्याची माहिती शनिवारी मिळाली. या माहितीच्या आधारे त्यांनी निरज विश्वकर्मा याच्याकडे चौकशी केली. तेव्हा त्याने अगोदर उडवाउडवीची उत्तरे दिली. त्यांच्याकडे कोणतेही ओळख पत्र नव्हते. त्याच्या गणवेशावर नेमप्लेट, पैरा बॅच, लेफ्टनंट असल्याचे बॅच आढळून आला. सैन्यदलाच्या गुप्तचर अधिकाऱ्यांनी त्यांच्याकडे चौकशी केल्यावर तो तोतया असल्याचे निष्पन्न झाले.

दिल्ली कॅटोंमेंट परिसराही तोतयाचा वावर: अधिक चौकशीमध्ये आरोपी निरज विश्वकर्मा हा लष्करी अधिकाऱ्याचा गणवेश घालून दिल्ली कॅटोंमेंट परिसरात फिरला आहे. तसेच १५ ऑगस्ट २०२३ रोजी लाल किल्ल्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ध्वजवंदन झाले होते. यावेळी त्याने सैन्यदलाचा गणवेश घालून कोणताही पास नसताना प्रवेश केला होता. तेथे लष्करी अधिकाऱ्याबरोबर भेट घेतली असून त्यांच्याबरोबर फोटो काढल्याचे समोर आले आहे. रेल्वे पोलिसांनी या तोतयाला अटक केली आहे. अधिक तपास पोलीस करत आहे.

यापूर्वीही पुण्यातून तोतया सैन्यदलाच्या अधिकाऱ्यास अटक: पुण्याच्या किरकटवाडी परिसरातून नोव्हेंबर, 2020 मध्ये तोतया सैन्यदलाच्या अधिकाऱ्याला अटक केली होती. तो मुळचा उत्तरप्रदेशचा रहिवाशी होता. त्याच्याकडून वेगवेगळी दहा बनावट ओळखपत्रे जप्त करण्यात आली होती. भारतीय सैन्यदलाच्या लेफ्टनंट कर्नल असल्याचे भासवून नागरिकांना फसवणाऱ्या एका तोतयाला पुणे ग्रामीण पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेने अटक होती. पुण्याच्या किरकिटवाडी परिसरात ही कारवाई करण्यात आली होती. अंकित कुमार सिंह (वय 23 सध्या राहणार उत्सव सोसायटी किरकट्वाडी मूळ राहणार हसनपूर, आमरोह, उत्तर प्रदेश) असे अटक केलेल्या तोतयाचे नाव होते.

हेही वाचा:

  1. Fake Military officer Nashik : तोतया लष्करी अधिकाऱ्याला अटक, अनेक मुलांची केली फसवणूक
  2. पुण्याच्या किरकटवाडी परिसरातून तोतया लष्करी अधिकारी अटकेत
  3. Thane Crime: सैन्यदलातील अधिकारी असल्याचं भासवून 7 महिलांशी लग्न, 'असा' प्रकार आला उघडकीस

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.