ETV Bharat / state

वातावरणातील बदलांमुळे उसाची उत्पादकता कमी होण्याची शेतकऱ्यांना भीती - ऊस शेतकरी पुणे

वातावरणातील अनिश्चिततेमुळे राज्यात जवळपास सगळीकडेच उसाला तुरे येण्याचे प्रमाण वाढले आहे. उसाच्या उत्पादनात यामुळे घट होण्याची भीती व्यक्त होत आहे.

pune
ऊस शेती
author img

By

Published : Dec 24, 2019, 10:53 AM IST

Updated : Dec 25, 2019, 10:52 AM IST

पुणे- वातावरणातील बदलामुळे एका दिवसातच तीन ऋतूंचा अनुभव घ्यावा लागतो. नोव्हेंबर महिन्यापासून हे बदल सातत्याने घडत असल्यामुळे उसाला तुरे येण्यास सुरूवात झाली. त्यामुळे उसाची उत्पादकता कमी होत आहे.

प्रतिक्रिया देताना कृषी तज्ञ विश्वनाथ डोळस

हवेत आर्द्रतेचे प्रमाण 65 ते 90 टक्के असावे लागते. सध्या वातावरणातील अनिश्चिततेमुळे राज्यात जवळपास सगळीकडेच उसाला तुरे येण्याचे प्रमाण वाढले आहे. उसाच्या उत्पादनात यामुळे घट होण्याची भीती व्यक्त होत आहे.

बदलत्या हवामानामुळे उत्पादनामध्ये सर्वसाधारण 15 ते 20 टक्के घट होण्याची शक्यता असते. उसाचा तुरा बाहेर येण्यास १८ महिन्यांचा कालावधी आवश्यक असतो. मात्र, वातावरणातील बदलामुळे हा तुरा निश्चित कालावधीच्या आधीच आल्याने आल्याने उसाची वाढ खुंटते. तुरा आलेला ऊस दीड ते दोन महिन्यांच्या पुढे राहिला तर तो पोकळ होतो. त्यानंतर एक ते दीड महिन्यात उसाची तोडणी करणे गरजेचे असते. कारण तुरे आल्यानंतर उसाचे वजन कमी होते. परिणामी उसाच्या सरासरी उत्पादनात घट होण्याची चिन्हे निर्माण होतात.

यावर काय उपाय करावा?

सध्याच्या परिस्थितीत उसाच्या प्रत्येक जातीला तुरे येण्याची शक्यता असते. मात्र, यावर उपाययोजना म्हणून ०:५२:३४ व ०:०:५० या खतांचा २५-७५ या प्रमाणात वापर करावा. पाण्याचे प्रमाणही नियंत्रित करावे. खतांच्या वापरामुळे उसाची फुगवण क्षमता वाढते. परिणामी उसाचे वजनही वाढण्यास मदत होते. याचा अपेक्षित परिणाम उसाच्या उत्पादनावर होऊन अशा परिस्थितीतही निश्चित उत्पादन वाढते, असे तज्ञांचे मत आहे.

Intro:Anc_सध्या वातावरणातील बदलामुळे सकाळी थंडी दिवसा ऊन आणि पाऊस असे सुरु आहे त्यामुळे एकाच दिवसांत तीनही ऋतु एकत्र आल्याने नोव्हेंबर महिन्यापासून उसाला तुरे येण्यास सुरुवात झालीय त्यामुळे उसाची उत्पादकता कमी होण्याची भीती असते अशावेळी काय उपाययोजना करावी जाणून घेऊया एक स्पेशल रिपोर्ट...

Vo_ऊसाला तुरे येण्यास दिवसा 26 अंश आणि रात्री 28 अंश तापमान गरजेचं असतं तसेच हवेत 65 ते 90 टक्के आर्द्रतेचे प्रमाण असावे लागते सध्या असेच पोषक वातावरण असल्यामुळे राज्यात जवळपास सगळीकडेच उसाला तुरे येण्याचे प्रमाण वाढले आहे
या दरम्यान ऊसाच्या शेड्यांतील काहीकपणा वाढवणारे अग्रकोमांची फुलकळीत रुपांतर होते त्यानंतर सात ते आठ दिवसात तुरा बाहेर येतो

Byte__विश्वनाथ डोळस _कृषी तज्ञ

Vo_तर या बदलत्या हवामानामुळे उत्पादनामध्ये सर्व साधारण 15 ते 20 टक्के घट येण्याची शक्यता आहे कारण तुरे आल्यानंतर वजन कमी मिळते परिणामी ऊसाच्या सरासरी उत्पादनात घट होण्याची चिन्ह निर्माण होतात

Byte__विश्वनाथ डोळस कृषी तज्ञ (परिणाम..)

Vo_ऊसाला तुरा बाहेर आल्याने उसाची वाढ खुंटते त्यानंतर एक ते दीड महिन्यात उसाची तोडणी करणं गरजेचं असतं मात्र यापुर्वी कारखाने उशिरा सुरु झाले त्यातून वातावरणातील बदलामुळे तुरे आल्याने दरवर्षीपेक्षा यावेळी १५ ते २० टक्क्यांनी ऊसाच्या उत्पादनात घट होऊन शेतकऱ्यांचं मोठं नुकसान होण्याची भिती शेतकरी व्यक्त करत आहे

Byte_विश्वनाथ डोळस कृषी तज्ञ

Byte _दत्तात्रय वाघमोडे _ शेतकरी

Vo_सध्या ऊसाच्या प्रत्येक जातीला तुरे येण्याची शक्यता असते मात्र यावर उपाययोजना म्हणुन ०:५२:३४ व ०:०:५० या खतांचा २५-७५ या प्रमाणात द्यायचे आहे त्यामुळे ऊसाचे वजन वाढवुन मजबुती येण्यास मदत होऊन उत्पादनात घट होणार नसल्याचे तज्ञांचे मत आहे

End vo_तुरा आलेला ऊस दीड ते दोन महिन्यांच्या पुढे राहिला तर ऊस पोकळ होतो यामुळे उत्पादनात घट येते हे टाळण्यासाठी तज्ञांनी सांगितलेले उपाय योजना लवकरात लवकर अंमलात आणणे आवश्यक आहे हेच या निमित्ताने सांगावे लागेल..Body:.....Conclusion:
Last Updated : Dec 25, 2019, 10:52 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.