ETV Bharat / state

मर्जीतले अधिकारी आणण्याचा डाव हे सरकार हाणून पाडेल - माजी आमदार गोरे - MLA dilip mohite news

खेडच्या तहसीलदार सुचित्रा आमले यांच्या पतीकडून धोका असल्यची तक्रार आमदार मोहिते यांनी खेड पोलिसांकडे केली आहे. तहसीदार-आमदारांच्या वादात सेनेचे माजी आमदार सुरेश गोरे यांनी उडी घेतली असून स्वतःच्या मर्जीचे अधिकारी आणण्याचा हा डाव सुरू असून महाविकास आघाडी हा डाव हाणून पाडेल, असे माजी आमदार गोरे म्हणाले.

ex MLA gore
ex MLA gore
author img

By

Published : Aug 11, 2020, 8:08 PM IST

राजगुरुनगर (पुणे) - खेड तहसीलदार यांच्या कार्यपद्धतीवर आरोप करत त्यांच्या बदलीची मागणी केल्यानंतर हा वाद शासकीय पातळीवर सुरू आहे. अशात तहसीलदार यांच्या पतीकडून धोका असल्याची तक्रार खेडचे राष्ट्रवादीचे आमदार दिलीप मोहितेंनी खेड पोलिसात केली. त्यानंतर मंगळवारी (11 ऑगस्ट) या वादात शिवसेनेचे माजी आमदार सुरेश गोरेंनी उडी घेतली आहे.

खेड तालुक्यात स्वतःच्या मर्जीचे अधिकारी आणण्यासाठी हा डाव सुरू असून हा त्यांचा डाव महाविकास आघाडीचे सरकार हाणून पाडेल. आमदार मोहितेंना कुणापासून धोका आहे हा विनोदच असल्याची मिश्कील टीका शिवसेनेचे माजी आमदार सुरेश गोरे यांनी केली.

ते पत्रकार परिषदेत बोलत होते. यावेळी शिवसेनेचे तालुकाध्यक्ष रामदास धनवटे, महिला जिल्हाध्यक्ष विजया शिंदे, माजी तालुकाध्यक्ष सुरेश चव्हाण उपस्थित होते.

आमदार गोरे म्हणाले, खेडचे तहसीलदार सुचित्रा आमले या कोरोनाकाळातही गाव, वस्त्यांपर्यंत जाऊन आपली जबाबदारी चोखपणे पार पाडत आहेत. त्यांच्या कामावर शंका घेणे चुकीचे असून उलट लोकप्रतिनिधींनी आधिकाऱ्यांमध्ये योग्य समन्वय ठेवत प्रशासनाकडून काम करुन घेण्याची गरज आहे. मात्र, खेडमध्ये कोरोनाच्या काळात लोकप्रतिनिधी हे आधिकाऱ्यांच्या बदलीच्या मागे लागले आहेत. यामध्ये त्यांचा काही स्वार्थ आहे का..? हे आता तपासण्याची वेळ आली असल्याचे शिवसेनेचे माजी आमदार सुरेश गोरे यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.

आमदार दिलीप मोहितेंना त्यांच्या मनाप्रमाणे काम करणारा आधिकारी हवा असेल. पण, त्यांच्या मनाप्रमाणे म्हणजे काय..? आधिकारी यांचे ऐकत नाही म्हणजे नेमके काय..?, चुकीची कामे करुन घेण्यासाठी आधिकारी बदलायचा का..?, असा थेट प्रश्न करत महाविकास आघाडीच्या सरकारच्या माध्यमातून चांगले काम करणाऱ्या आधिकाऱ्यांच्या मागे उभे राहू, असा विश्वास शिवसेनेचे माजी आमदार सुरेश गोरेंनी माध्यमांशी बोलताना व्यक्त केला.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.