पुणे : पुणे महापालिका येथील बाहेरील बाजूस बहात्तर वर्षांचे बबनराव भाऊसाहेब डोंगरे रस्त्याने पायी निघाले होते. ( Even while on duty police saved life ) त्यांना अचानक चक्कर आल्याने ते रस्त्यावरच कोसळले. डोक्याला मार लागल्याने ते बेशुद्ध पडले आणि रक्त येऊ लागले. (saved life of senior citizen ) त्यावेळी मोठ्या प्रमाणावर बघ्यांची गर्दी जमली होती. कोणीही हात लावायला तयार नव्हत. याचवेळी तेथून कोर्टात रिमांडसाठी निघालेले पोलिस उपनिरीक्षक सुरेश जायभाये ( SubInspector of Police Suresh Jaibhaye ) यांनी गर्दीत जाऊन त्या वृद्धावर प्राथमिक उपचार करून तत्काळ दवाखान्यात दाखल केले. ते शुद्धीवर आल्यानंतरच ते परत कोर्टात हजर झाले. एकीकडे कोर्टात आरोपीचे रिमांड घेणे महत्त्वाचे असताना देखील रस्त्यावरील ज्येष्ठ नागरिकाची (Senior citizens ) अवस्था पाहून त्यांनी क्षणाचाही विलंब न करता, परिस्थितीचे गांभीर्य पाहून तत्काळ मदत केल्याने त्यांचे प्राण वाचले.
नागरिकांची मोठी गर्दी जमली : ज्येष्ठ नागरिक डोंगरे हे मूळचे फुगेवाडी भोसरी येथील राहणारे असून खडकी येथील दारूगोळा कारखान्यातून सेवानिवृत्त (Retired from Ammunition Factory ) झाले आहेत. दोन दिवसांपूर्वी ते कामानिमित्त महापालिकेच्या परिसरात आले होते. तेथून रस्त्याने पायी चालत जात असताना त्यांना अचानक भोवळ आली आणि ते रस्त्यावरच कोसळले. बेशुद्ध पडले. त्यांच्या डोक्याला मार लागल्याने रक्त येऊ लागले. त्यामुळे नागरिकांची मोठी गर्दी जमली होती. परंतु, कोणी पुढे येईना. त्यांनी गर्दीत जाऊन पाहिले तेव्हा ज्येष्ठ नागरिक रस्त्यावर बेशुद्ध पडलेले दिसले.
ससून रुग्णालयात दाखल : क्षणाचाही विलंब न करता, जायभाये यांनी प्राथमिक उपचार करून त्यांना शुद्धीवर आणण्याचा प्रयत्न केला. थोडीशी शुद्ध आल्यानंतर जायभाये यांनी त्यांना त्याच रिक्षातून स्वतः ससून रुग्णालयात दाखल केले. डॉक्टरांनी त्यांच्यावर तत्काळ उपचार सुरू केले. काही वेळानंतर ज्येष्ठ नागरिक शुद्धीवर आले. ते शुद्धीवर येईपर्यंत जायभाये तेथेच थांबून होते. त्यानंतर जायभाये यांनी ज्येष्ठांच्या घरी संपर्क साधून त्यांच्या मुलांना ससून रुग्णालयात बोलावून घेतले. नंतरच ते आपल्या कर्तव्यावर रवाना झाले.
2 डिसेंबर 2022 रोजी पोलिसांनी वाचवले श्वानाचे प्राण : रस्त्याच्या कडेला असेलेल्या श्वानाच पिल्लाला पोलिसांनी वर्गणी गेळा करुण वाचवले आहे. पायावरून दुचाकीचे चाक गेल्याने श्वानाचे पिल्लु जखमी झाले होते. यावेळी बदलापूर पश्चिमेकडील पोलीस ठाण्यातील काही कर्मचाऱ्यांनी या पिल्लाला जीवनदान दिले आहे. चाकी पायावरून गेल्याने तीन महिन्याचे एक श्वानाच पिल्लू रस्त्याच्या कडेला जीवाच्या आकांताने विव्हळत होतं. हे पिल्लू बदलापूर पश्चिमेकडील पोलीस ठाण्यातील काही कर्मचाऱ्यांना दिसून आलं. त्यानंतर त्याचा जीव वाचविण्यासाठी या पोलीस कर्मचाऱ्यांनी प्रसंगावधान दाखवून जखमी श्वानाला उपचारासाठी पशुवैद्यकीय रुग्णालयात दाखल केले. त्यावेळी श्वान पिल्लाच्या एका पायावर शस्त्रक्रिया करण्यासाठी पोलिसांनीच २५ हजार वर्गणी गोळा त्याचे प्राण बचावले.