ETV Bharat / state

ईटीव्ही भारत इम्पॅक्ट: जिल्हा बँकेच्या पीककर्ज वसुलीला 30 जूनपर्यंत मुदतवाढ - जिल्हा बँक

पीक कर्जाची परतफेड 31 मार्चपूर्वी केल्यास 50 हजार रुपयांची सवलत देण्याचा निर्णय राज्य सरकारकडून घेण्यात आल्यानंतर जिल्हा बँकेच्या बाहेर पीक कर्जाचा भरणा करण्यासाठी शेतकऱ्यांच्या रांगा लागल्या होत्या. यामुळे कोरोनाचा प्रादुर्भाव वाढण्याची भीती व्यक्त केली जात असल्याची बातमी ईटीव्ही भारतने देताच जिल्हा बँकेने या बातमीची गांभीर्याने दखल घेऊन पीक कर्जाला आता 30 जूनपर्यंत मुदतवाढ दिली आहे.

etv bharat impact dcc bank incrise date for crop loan
जिल्हा बँकेच्या पीककर्ज वसुलीला 30 जूनपर्यंत मुदतवाढ
author img

By

Published : Mar 28, 2020, 5:26 PM IST

पुणे - खरीप हंगामात जिल्हा बँकेमार्फत बिनव्याजी कर्जाचे वाटप करण्यात आले होते. या कर्जाची परतफेड 31 मार्चपूर्वी केल्यास 50 हजार रुपयांची सवलत देण्याचा निर्णय राज्य सरकारकडून घेण्यात आला होता. त्यामुळे शेतकरी जिल्हा बँकेच्या बाहेर रांगा लावून पीक कर्जाचा भरणा करत होते. त्यामुळे कोरोनाचा प्रादुर्भाव वाढण्याची भीती व्यक्त केली जात असल्याची बातमी ईटीव्ही भारतने दिली. त्यानंतर जिल्हा बँकेने या बातमीची गांभीर्याने दखल घेऊन पीक कर्जाला आता 30 जूनपर्यंत मुदतवाढ देण्यात आल्याची माहिती जिल्हा बँकेचे संचालक व आमदार दिलीप मोहिते-पाटील यांनी दिली.

जिल्हा बँकेच्या पीककर्ज वसुलीला 30 जूनपर्यंत मुदतवाढ
सध्या कोरोनाचा प्रादुर्भाव देशभरात वाढत असताना नागरिकांनी सार्वजनिक ठिकाणी गर्दी करू नये, असे आवाहन प्रशासनाकडून केले जात होते. अशातच पीक कर्ज 31 मार्चपूर्वी भरल्यास या पिककर्जावर 50 हजार रुपयांची सवलत मिळणार असल्याने शेतकरी जिल्हा बँकेमध्ये गर्दी करून पीक कर्जाच्या पैशाचा भरणा करत होते. या गंभीर परिस्थितीची बातमी ईटीव्ही भारतने दिल्यानंतर जिल्हा बँकेच्या प्रशासनाकडून गांभीर्याने दखल घेऊन तातडीने या पीक कर्जाची मुदत 30 जून पर्यंत वाढवण्यात आली आहे. यावर्षीचा पीक कर्ज 1 एप्रिल ते 6 एप्रिल दरम्यान वाटप करण्याच्या सूचनाही देण्यात आल्याची माहिती जिल्हा बँकेचे संचालक दिलीप मोहिते-पाटील यांनी दिली. जिल्हा बँकेच्या माध्यमातून शेतकऱ्यांसाठी तीन लाखांपर्यंत पीककर्ज दिले जाते या कर्जाची परतफेड वर्षात करायची असते. त्यामुळे नियमित ते कर्जाची परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना या पीक कर्जातून 50 हजार रुपयांची सवलत देण्यात येणार आहे. मात्र ही मुदत 30 जून पर्यंत वाढवण्यात आली असून शेतकऱ्यांना या मुदत वाढीमुळे दिलासा मिळणार आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.