ETV Bharat / state

पुणे विभागात 3 हजार क्विंटल अन्नधान्याची आणि 4 हजार 483 क्विंटल भाजीपाल्याची आवक

पुणे विभागात 2 मे 2020 रोजी 103.47 लाख लिटर दुधाचे संकलन झाले असून 23.49 लाख लिटर दुधाचे पॅकेजिंग स्वरुपात वितरण झाले आहे. तर उर्वरित दूध सुट्टया स्वरुपात वितरित करण्यात आले आहे, असेही डॉ. म्हैसेकर यांनी सांगितले.

essencial services stock in pune division
विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर
author img

By

Published : May 3, 2020, 2:31 PM IST

पुणे - सध्याच्या लॉकडाऊन काळात पुणे विभागात अन्नधान्य व भाजीपाल्याचा पुरेसा साठा उपलब्ध आहे. विभागात अंदाजे 3 हजार क्विंटल अन्नधान्याची तर 4 हजार 483 क्विंटल भाजीपाल्याची आवक मार्केटमध्ये झाली आहे. विभागात 985 क्विंटल फळांची आवक तसेच कांदा-बटाट्याची आवक 660 क्विंटल इतकी झाली आहे, अशी माहिती विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर यांनी दिली आहे.

पुणे विभागात 2 मे 2020 रोजी 103.47 लाख लिटर दुधाचे संकलन झाले असून 23.49 लाख लिटर दुधाचे पॅकेजिंग स्वरुपात वितरण झाले आहे. तर उर्वरित दूध सुट्टया स्वरुपात वितरित करण्यात आले आहे, असेही डॉ. म्हैसेकर यांनी सांगितले.

सध्याच्या लॉकडाऊन परिस्थितीत स्थलांतर केलेल्या मजुरांसाठी जिल्हा प्रशासनामार्फत 227 कॅम्प (159 + कामगार विभागामार्फत 68) तर साखर कारखान्यांमार्फत 251 कॅम्प असे पुणे विभागात एकुण 478 रिलीफ कॅम्प उभारण्यात आले आहेत. या कॅम्पमध्ये 33 हजार 821 स्थलांतरित मजूर असून 1 लाख 5 हजार 621 मजुरांना भोजन देण्यात येत आहे, अशी माहिती विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर यांनी दिली.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.