ETV Bharat / state

'प्रतिबंधित क्षेत्रातील व्यक्ती आरोग्य तपासणीतून सुटणार नाही याची दक्षता घ्यावी'

घरोघरी जाऊन नागरिकांचे आरोग्यकविषयक सर्व्हेक्षण करण्यात यावे, डॉक्टरांनी आवश्यक ती खबरदारी घेवून रुग्णांची वैद्यकीय तपासणी करावी, वैद्यकीय तपासणीच्या कामात कोणत्याही प्रकारची दिरंगाई खपवून घेतली जाणार नसल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे.

pune collector visit modikahana area
नागरिकांशी संवाद साधताना पुण्याचे जिल्हाधिकारी
author img

By

Published : May 3, 2020, 5:47 PM IST

पुणे - कॅन्टोन्मेंट क्षेत्रातील मोदीखाना व महानगरपालिका क्षेत्रातील कोरोना रुग्ण आढळलेल्या प्रतिबंधित क्षेत्रातील उपाययोजना व आरोग्य सुविधाबाबत जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी पहाणी केली आहे. प्रतिबंधित क्षेत्रात पॉझिटिव्ह रुग्णांच्या संपर्कात आलेल्या किमान २० नागरिकांची कोरोना चाचणी करण्यात यावी, तसेच या आरोग्य तपासणीतून कोणताही व्यक्ती सुटणार नाही याची दक्षता घेण्याच्या सूचना जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी दिल्या आहे.

जिल्हाधिकाऱ्यांनी पुणे कॅन्टोन्मेंट रुग्णालयासाठी साधनसामुग्री व अन्य बाबींसाठी निधीची आवश्यकता असेल तर निधी उपलब्ध करून देण्यात येईल, असेही सांगितले. मोदीखाना व लगतच्या महानगरपालिका क्षेत्रात कोरोनाचे रुग्ण आढळले होते. हे दोन्ही क्षेत्र प्रशासनाने प्रतिबंधित केले आहे. येथे महानगरपालिका व जिल्हा प्रशासनासोबतच पुणे कॅन्टोन्मेंटच्यावतीने विविध उपाययोजना करून कोरोनाबाधित रुग्णांच्या संपर्कात आलेल्या नागरिकांचा शोध घेण्यात येत आहे. सोबतच येथील नागरिकांची आरोग्य तपासणी, नागरिकांना मूलभूत सुविधा पुरवण्याबाबत उपाययोजना केल्या जात आहेत.

सर्व उपाययोजनांच्या पाहणीबरोबरच जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी उपस्थितांशी संवाद साधला. यावेळी पुणे कॅन्टोन्मेंटचे स्टेशन कमांडर ब्रिगेडियर कुलजित सिंग, पुणे कॅन्टोन्मेंटचे मुख्य कार्यकारी अधिकारी अमित कुमार, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अशोक नांदापूरकर, डी. सी. पी. सरदेशपांडे, डॉ. गायकवाड आदी उपस्थित होते. जिल्हाधिकारी राम म्हणाले, पुणे कॅन्टोन्मेंट रुग्णालयासाठी यापूर्वी अडीच कोटी रुपयांचा निधी देण्यात आला आहे. कोरोनाच्या प्रतिबंधासाठी साधनसामुग्री व अन्य बाबींसाठी आवश्यक निधी उपलब्ध करून देण्यात येईल. तसेच प्रतिबंधित क्षेत्रातील प्रत्येकाने मास्कचा वापर करणे आवश्यक असल्याचे जिल्हाधिकारी राम यांनी सांगितले. त्याचबरोबर, पुणे कॅन्टोन्मेंट व पुणे महानगरपालिकेने आवश्यकतेप्रमाणे मास्कचा पुरवठा तसेच जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा घरपोच करण्याबाबत सूचना केल्या.

घरोघरी जाऊन नागरिकांचे आरोग्यकविषयक सर्व्हेक्षण करण्यात यावे, डॉक्टारांनी आवश्यक ती खबरदारी घेवून रुग्णांची वैद्यकीय तपासणी करावी, वैद्यकीय तपासणीच्या कामात कोणत्याही प्रकारची दिरंगाई खपवून घेतली जाणार नसल्याचेही जिल्हाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे. जिल्हाधिकारी राम यांनी प्रतिबंधित क्षेत्रातील शौचालयांचा वापर, वैयक्तिक स्वच्छता ठेवणे, मास्कचा वापर आणि निर्जंतुकीकरण आदी विषयाबांबत नागरिकांशी संवाद साधत परिसराची पहाणी केली. यावेळी पुणे कॅन्टोन्मेंट, पुणे महानगरपालिका तसेच प्रशासनातील अधिकारी उपस्थित होते.

हेही वाचा- चासकमान धरणाच्या डाव्या कालव्यातून पाण्याची गळती; आवर्तन बंद

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.