ETV Bharat / state

‘निसर्ग’ चक्रीवादळाच्या थैमानाने वीजयंत्रणेला 'फटका'; पुणे, पिंपरीसह ग्रामीण भागात 'बत्तीगूल'

पुणे जिल्ह्यातील वीजयंत्रणेवर मोठी झाडे व फांद्या कोसळल्याने प्राथमिक माहितीनुसार सुमारे 540 वीजवाहिन्यांचा वीजपुरवठा बंद पडला. यामध्ये प्रामुख्याने मावळ, जुन्नर, आंबेगाव व खेड तालुक्यांमधील 340 वीजवाहिन्यांचा वीजपुरवठा सुरक्षिततेच्या कारणासाठी बंद ठेवण्यात आला आहे.

Pune
वीजयंत्रणेवर पडलेले झाड
author img

By

Published : Jun 4, 2020, 1:00 AM IST

Updated : Jun 4, 2020, 6:09 AM IST

पुणे - बुधवारी सकाळपासून जिल्ह्यात सुरु असलेल्या ‘निसर्ग’ चक्रीवादळाच्या थैमानात वीजयंत्रणेवर मोठा आघात झाला आहे. वीजयंत्रणेवर मोठी झाडे व फांद्या कोसळल्याने प्राथमिक माहितीनुसार सुमारे 540 वीजवाहिन्यांचा वीजपुरवठा बंद पडला. यामध्ये प्रामुख्याने मावळ, जुन्नर, आंबेगाव व खेड तालुक्यांमधील 340 वीजवाहिन्यांचा वीजपुरवठा सुरक्षिततेच्या कारणासाठी बंद ठेवण्यात आला आहे. तसेच पुणे शहराच्या विविध भागात तसेच पिंपरी चिंचवड व भोसरीमधील बहुतांश भागात वीजपुरवठा विस्कळीत झाला असल्याची माहिती महावितरणच्या वतीने देण्यात आली.

वादळामुळे महावितरणच्या वीजयंत्रणेचे शहरी व ग्रामीण भागात मोठे नुकसान झाले असून त्याबाबतची स्थिती गुरुवारी सायंकाळपर्यंत स्पष्ट होईल. तसेच महावितरणचे सर्व अभियंते व कर्मचारी वीजपुरवठा पूर्ववत करण्यासाठी युद्धपातळीवर दुरुस्तीचे कामे करीत आहेत. आज रात्री उशिरापर्यंत खंडित झालेला वीजपुरवठा पूर्ववत करण्याचे प्रयत्न सुरु असल्याचे प्रसिध्दीसाठी दिलेल्या पत्रकात म्हटले आहे.

पुणे शहरात वादळी पावसामुळे 85 वीजवाहिन्यांचा वीजपुरवठा विस्कळीत झाला आहे. यामध्ये रास्तापेठ, एनआयबीएम रोड, खडी मशीन चौक, कोंढवा, उंद्री, येवलेवाडी, वानवडी, गुरुवार पेठ, दत्तवाडी, हिंगणे, धायरी, रामटेकडी, मुंढवा, हडपसर, मगरपट्टा, पिसोळी, केशवनगर, महंमदवाडी, कोरेगाव पार्क, कोथरूड, शिवणे, वारजे परिसर, गांधीभवन परिसर, बिबवेवाडी, धनकवडी, तळजाई पठार, अंबिकानगर, भिलारेवाडी, गंगाधाम रोड, कात्रज आदी भागांचा समावेश आहे.

Last Updated : Jun 4, 2020, 6:09 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.