पुणे- शिवसेनेचे राज्यसभा खासदार संजय राऊत यांनी आयुष मंत्रालयाने कोंबडी आणि अंड्याला शाकाहारी म्हणून घोषित करावे. तसेच कोंबडी आणि अंड्याला शाकाहाराचा दर्जा मिळावा, अशी मागणी केली होती. यावर सर्व जीव मंगल प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष डॉ. कल्याण गंगवाल यांनी आपली भूमिका मांडली आहे.
डॉ. कल्याण गंगवाल म्हणाले की, ज्या पेशीला सेल मेम्ब्रेन असतो, तो पदार्थ मांसाहारी असतो. ज्या पेशीला सेलवॉल असते तो शाकाहारी, अंड्याला सेल मेम्ब्रेन आहे त्यामुळे ते मांसाहारी आहे. अंडे कोंबडीच्या गर्भाशयातून येते. प्रत्येक फलित वा अफलित अंड्यात जिवंत स्त्रीबीज असते. अंड्याच्या कवचावर १५००० सूक्ष्म छिद्रे असतात. त्यातून आतील स्त्रीबीज श्वासोच्छवास करत असतात. अंडे इन्क्युबेटरमध्ये ठेवले असता, ते ऑक्सिजन घेते, हे त्याच्या जिवंतपणाचे लक्षण आहे. मुळे त्याला शाकाहारी म्हणणे चुकीचे आहे. अशा स्वरूपाचा निष्कर्ष शास्त्रज्ञ पीटर रॉम्पकीन्स क्रिस्तोर यांच्या ‘द सिक्रेट लाईफ ऑफ प्लॉट्स’ या पुस्तकातही केला आहे.
अफलित अंडी शाकाहारी म्हणून विकणे सामाजिक गुन्हा
पूर्वी भाजीवाल्यांच्या दुकानात अंड्याची विक्री जात होती. आम्ही ऍडव्हर्टायझिंग कौन्सिलकडे तक्रारी केल्या. त्यांनीही अंडे मांसाहारी असल्याचे मान्य केले होते. अफलित अंडी शाकाहारी म्हणून विकणे सामाजिक गुन्हा असल्याचा निकाल एडव्हर्टायजिंग स्टँडर्ड्स कौंसिल ऑफ इंडियाने (भारतीय विज्ञापन मापक परिषद) २६ में १९९० रोजी दिला आहे, हेदेखील लक्षात घेतले पाहिजे.
अंड्याला शाकाहारी ठरवण्यामागे आर्थिक आणि राजकीय खेळी
कोंबडी आणि अंड्याला शाकाहाराचा दर्जा मिळावा ही मागणी चुकीची आहे. जोपर्यंत अंडे हे कोंबडीच्या पोटातून न येता किंवा झाडाला लागत नाही, तोपर्यंत हा दावा मान्य करता येणार नाही. अंड्याला शाकाहारी ठरवण्यामागे आर्थिक आणि राजकीय खेळी आहे असा आरोपही त्यांनी केला आहे. आम्ही शाकाहाराचे समर्थन करणाऱ्या सर्व संघटना एकत्रित येत खासदार संजय राऊत यांच्या मागणीचा विरोध करणार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.
-
Rajya Sabha MP @rautsanjay61's Remarks | Discussion on the working of the Ministry of AYUSHhttps://t.co/ZKBzQFncow via @YouTube
— Rajya Sabha TV (@rajyasabhatv) July 15, 2019 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">Rajya Sabha MP @rautsanjay61's Remarks | Discussion on the working of the Ministry of AYUSHhttps://t.co/ZKBzQFncow via @YouTube
— Rajya Sabha TV (@rajyasabhatv) July 15, 2019Rajya Sabha MP @rautsanjay61's Remarks | Discussion on the working of the Ministry of AYUSHhttps://t.co/ZKBzQFncow via @YouTube
— Rajya Sabha TV (@rajyasabhatv) July 15, 2019