ETV Bharat / state

खेड तालुक्यात खासगी इंग्रजी माध्यमाच्या शाळांच्या फी वसुलीला शिक्षण विभागाचा चाप

खेड तालुक्यातील खासगी इंग्रजी माध्यमाच्या शाळा फीसाठी त्रास देत असल्याच्या अनेक तक्रारी शिक्षण विभागाकडे येत आहेत. त्यामुळे सर्व शाळांना नोटीस देण्यात आली असून संस्था चालक व मुख्याध्यापक यांनी शासकीय नियमांचे काटेकोर पालन करावे, अन्यथा संस्था चालक व शाळांवर शिस्तभंगाची कडक कारवाई करणार असे संकेत गटशिक्षण अधिकारी संजय नाईकडे यांनी दिले आहे.

author img

By

Published : Dec 3, 2020, 9:16 AM IST

education-department-has-ordered-to-private-english-medium-schools-in-khed-taluka-not-to-charge-extra-fee
खेड तालुक्यात खासगी इंग्रजी माध्यमाच्या शाळांच्या फी वसुलीला शिक्षण विभागाचा चाप

राजगुरुनगर (पुणे) - जिल्ह्यातील खेड तालुक्यात इंग्रजी माध्यमाच्या खासगी शाळा ऑनलाइन शिक्षणाच्या नावाखाली संपुर्ण वर्षाच्या फी वसुली करत आहेत. अशातच खेड पंचायत समितीच्या शिक्षण विभागाने खासगी इंग्रजी माध्यमाच्या शाळांना नोटीस काढली आहे. विद्यार्थी व पालकांना फी वसुलीसाठी तगादा लावल्यास शाळांवर शिस्तभंगाची कारवाई करण्याचा इशारा गट शिक्षण आधिकारी संजय नाईकडे यांनी दिला आहे

खासगी शाळांनी अतिरिक्त फी न आकारण्याचे गट शिक्षण आधिकारी संजय नाईकडे यांचे आदेश..
शाळांनी शासकीय नियमांचे पालन करा -कोरोना महामारीच्या संकटांमुळे शाळा बंद ठेवून विद्यार्थांना ऑनलाइन शिक्षण देण्याची परवानगी शाळांना दिली आहे. मात्र, ऑनलाइन शिक्षण सुरू असताना इंग्रजी माध्यमाच्या शाळांनी व संस्थांनी लॉकडाऊनच्या काळात विद्यार्थांकडून "शिकवणी फी" घ्यावी आणि ही फी मुदतीचे टप्पे ठरवून घ्यावी, विद्यार्थी व पालकांना फी साठी तगादा लावू नये, फी वसुलीसाठी त्रास देऊन विद्यार्थांचे ऑनलाइन शिक्षण, परीक्षा, अभ्यासक्रम व इतर शैक्षणिक उपक्रमांवर बंदी करू नये, उलट विद्यार्थी व पालकांचे प्रबोधन करून पालकांकडून फक्त शिकवणी फीची आकाराणी करण्याचे आवाहन गट शिक्षण आधिकारी संजय नाईकडे यांनी राजगुरुनगर येथे केले आहे. शिस्तभंगाची कडक कारवाई -लॉकडाऊनच्या काळात शाळा बंद असल्याने विद्यार्थांना ऑनलाइन शिक्षण दिले जावे. फी घेत असताना पालकांकडून संगणक लॅब, ग्रंथालय, मैदान, क्रीडा साहित्य व इतर शालेय उपक्रमांतर्गत आकारली जाणारी फी आकारू नये. खेड तालुक्यातील खासगी इंग्रजी माध्यमाच्या शाळा फीसाठी त्रास देत असल्याच्या अनेक तक्रारी शिक्षण विभागाकडे येत आहेत. त्यामुळे सर्व शाळांना नोटीस देण्यात आली असून संस्था चालक व मुख्याध्यापक यांनी शासकीय नियमांचे काटेकोर पालन करावे, अन्यथा संस्था चालक व शाळांवर शिस्तभंगाची कडक कारवाई करणार असे संकेत गटशिक्षण अधिकारी संजय नाईकडे यांनी दिले आहे.

हेही वाचा -सरकारचा मोठा निर्णय; सात जिल्ह्यातील तलाठी भरतीचा मार्ग मोकळा

हेही वाचा -राज्यातील बॉलिवूड कुठेही जाण्याची शक्यता नाही - अनिल देशमुख

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.