ETV Bharat / state

भीमाशंकरच्या कोकण कड्यावर पर्यावरणपूरक होळी साजरी - पर्यावरणपूरक होळी साजरी

भीमाशंकर हा परिसर जंगलाचा आहे. या परिसरातील जंगल कायम टिकून राहावे व निसर्गाचे हे देखणे रुप नष्ट होऊ नये, यासाठी आज होळी सण साजरा करताना लाकूड न जाळता पारंपरिक पद्धतीने आदिवासी बांधवांनी होळीचा सण साजरा केला.

भीमाशंकरच्या कोकण कड्यावर पर्यावरणपूरक होळी साजरी

author img

By

Published : Mar 10, 2020, 7:16 AM IST

Updated : Mar 10, 2020, 7:41 AM IST

पुणे - बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक असणाऱ्या श्री क्षेत्र भीमशंकर येथे परंपरेनुसार पंचक्रोशीतील राजपूर, निगडाळे, भीमशंकर येथील नागरिकांनी कोकण कड्यावर धार्मिक पद्धतीने होळी पेटवून होळी पोर्णिमेचा सण साजरा केला. विशेष म्हणजे या वेळी होळीमध्ये लाकूड न जाळता फक्त पाला पाचोळा व शेणाच्या गोवऱ्या पेटवून पर्यावरणपूरक होळी साजरी करण्याचा प्रयत्न केला.

भीमाशंकरच्या कोकण कड्यावर पर्यावरणपूरक होळी साजरी

भीमाशंकर हा परिसर जंगलाचा आहे. या परिसरातील जंगल कायम टिकून राहावे व निसर्गाचे हे देखणे रुप नष्ट होऊ नये, यासाठी आज होळी सण साजरा करताना लाकूड न जाळता पारंपरिक पद्धतीने आदिवासी बांधवांनी होळीचा सण साजरा केला.

हेही वाचा - देहू नगरीत तुकाराम बीज सोहळ्यानिमित्त प्रवेशद्वारावर आकर्षक विद्युत रोषणाई

प्राचीन काळापासून भीमाशंकर येथील होळीचे एक वेगळे महत्व मानले जाते. भीमाशंकर येथील ही कोकण कड्यावरील होळी पेटल्यानंतरच परंपरेनुसार तळकोकणातील गावांमधील होळ्या पेटविल्या जातात. त्यामुळे आज भीमाशंकर येथील कोकण कड्यावरील होळीत लाकडाची होळी करण्यात आली नाही.

हेही वाचा - दुबईहून पुण्यात परतलेल्या दांपत्याला कोरोनाची लागण, देशभरात एकूण 47 रुग्ण

Last Updated : Mar 10, 2020, 7:41 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.