बारामती (पुणे) - पेट्रोल-डिझेलचे दर आता शंभर रुपयांपर्यंत वाढत आहेत. केंद्र सरकार शेतकऱ्यांसह कोणाचे ऐकून घ्यायला तयार नाही, घ्या अच्छे दिन, असे म्हणत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी भाजपवर निशाणा साधला.
निधी उपलब्ध करण्यासाठी अडचणी येताहेत
आधीच कोरोनामुळे अनेक अडचणी निर्माण झाल्या आहेत. त्यात विकास कामांसाठी आवश्यक असणाऱ्या स्टील, डांबर व सिमेंटचे दर वाढले आहेत. त्यामुळे विकासकामांसाठी निधी उपलब्ध करण्यासाठी अडचणी येत आहेत, असे पवार म्हणाले.
तीन पिढ्यांपासून आमच्यासोबत असला तरी त्याची हयगय केली जाणार नाही
पवार म्हणाले, बारामतीत पिस्तूल आणि जिवंत काडतुसे सापडणे ही बाब गंभीर आहे. बारामती शहर व तालुक्यात अवैद्य धंदे, सावकारी, वाळू माफिया, सराईत गुन्हेगारांवर पोलिसांनी मोक्कांतर्गत कारवाई करावी. तसेच बारामतीत तुमच्या जवळचा कोणीही गैरप्रकार करत असेल तर त्यांना वेळीच सावध करा. बारामतीत चूकीचे व नियमा बाहेर जाऊन कोणी काही करत असेल तर तो कोणीही अगदी तीन पिढ्यांपासून आमच्या बरोबर राहिलेला असला तरीही त्याची हायगय केली जाणार नाही, असा परखड इशारा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिला.
हेही वाचा - अण्णा हजारे हे हास्यास्पद व्यक्तिमत्व - डॉ. भालचंद्र मुणगेकर