ETV Bharat / state

लॉकडाऊनमुळे बंद असलेल्या शाळा, महाविद्यालयांनी निवडला 'व्हर्च्युअल' शिक्षणाचा मार्ग - ऑनलाईन वर्ग

पुण्यातील खासगी शाळांमध्ये वेबसेमिनार, व्हाट्सअॅपच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना असाईनमेंट देण्यासह त्यांच्या शैक्षणिक अडचणी सोडवल्या जाता आहेत. पुणे शहरात अनेक खासगी शाळांनी झूम तसेच गुगलसारख्या माध्यमातून व्हर्च्युअल क्लासदेखील सुरू केले आहेत. तसेच महाविद्यालयातही अशाप्रकारे शिकवायला व्हर्चुअल क्लासरूम घेण्यात येत आहेत.

लॉकडाऊनमुळे बंद असलेल्या शाळा, महाविद्यालयांनी निवडला 'व्हर्च्युअल' शिक्षणाचा मार्ग

author img

By

Published : Apr 13, 2020, 6:56 PM IST

पुणे - कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी देशात लॉकडाऊन आहे. त्याचा शिक्षण क्षेत्रावर विपरित परिणाम झाला असून शाळा बंद ठेवण्यात आल्या आहेत. या शैक्षणिक वर्षाच्या परीक्षांवरही याचा परिणाम झाला आहे. शाळा कधी सुरू होणार याबाबत अजूनही शिक्षक, पालक, विद्यार्थी आणि मुख्याध्यापक यांच्यामध्ये संदिग्धता आहे. या काळात विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये म्हणून शाळा महाविद्यालयांकडून ई - लर्निंगच्या विविध माध्यमांचा वापर केला जात आहे.

पुण्यातील खासगी शाळांमध्ये वेबसेमिनार, व्हाट्सअॅपच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना असाईनमेंट देण्यासह त्यांच्या शैक्षणिक अडचणी सोडवल्या जाता आहेत. पुणे शहरात अनेक खासगी शाळांनी झूम तसेच गुगलसारख्या माध्यमातून व्हर्च्युअल क्लासदेखील सुरू केले आहेत. तसेच महाविद्यालयातही अशाप्रकारे शिकवायला व्हर्चुअल क्लासरूम घेण्यात येत आहेत.

पुण्यातील ज्ञानप्रबोधिनी, एमआयटी, भारती विद्यापीठ, आझम कॅम्पस, महाराष्ट्र विद्यार्थी सहाय्यक मंडळ अशा संस्थेतील विविध शाखांतील मुख्याध्यापक व शिक्षक यांना झूम अॅपद्वारे मार्गदर्शन करून विविध शाखांमध्ये इयत्तेनुसार व्हाट्सअॅप ग्रुप तयार करून तसेच पर्सनल कॉलिंग करून समुपदेशन आणि मार्गदर्शन केले जात आहे. तसेच झूम अॅप आणि गुगल क्लासरूमद्वारे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणे सुरू केले आहे. तसेच ई-बालभारती वरील पुस्तके विद्यार्थ्यांना उपलब्ध करून देण्यात आलेली आहेत.

लॉकडाऊनमुळे बंद असलेल्या शाळा, महाविद्यालयांनी निवडला 'व्हर्च्युअल' शिक्षणाचा मार्ग

महाराष्ट्र विद्यार्थी सहाय्यक मंडळाने 'लर्न फ्रॉम होम' सुविधा राबवली आहे. केजे एज्युकेशनल इन्स्टिट्यूटच्या वतीने 'लर्न फ्रॉम होम' संकल्पनेची अंमलबजावणी केली जात आहे. विविध सोशल साईट्स, लर्निंग अॅप्लिकेशन्स आणि मोबाईलच्या वापरातून नावीन्यपूर्ण पद्धतीने विद्यार्थ्यांना शिकवण्यात येत आहे. ट्रिनिटी अकॅडमी ऑफ इंजिनिअरिंगमध्ये विद्यार्थ्यांना रोज विविध विषयांच्या नोट्स, प्रात्यक्षिके, असाईनमेंट दिल्या जात आहेत. त्यांचे मूल्यमापन आणि त्यांना येणाऱ्या शंकांचे निरसन वैयक्तिक पातळीवर केले जात आहे. आठवड्याचे सबमिशन आणि त्याचा पाठपुरावा केला जातो. सर्व प्राध्यापकांच्या, विभागप्रमुखांच्या बैठका व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे घेतल्या जात आहेत.

लॉकडाऊनच्या काळात अभियांत्रिकी शिक्षणात सातत्य राहण्यासाठी हा उपक्रम केला जात आहे.महाराष्ट्र कॉस्मॉपॉलिटन एज्युकेशन सोसायटीच्या इन्स्टिटयूट ऑफ फार्मसीमध्येही लर्निंग मॅनेजमेंट सिस्टिमची अंमलबजावणी केली गेली आहे. बाइंडर एन्टरप्राईझ व्हर्जन, गूगल क्लासरूम आणि गो ब्रँच या वेबसाईटचा प्रभावी वापर करून विद्यार्थ्यांसाठी आभासी वर्ग (virtual classroom) तयार केली आहे. भारती विद्यापीठ अभियांत्रिकी महाविद्यालयात 'ऑन लाईन एज्युकेशन 'आय आय टी मुंबई व्हर्च्युअल लॅबच्या सहकार्याने प्रॅक्टिकल्स, भारती विद्यापीठ अभियांत्रिकी महाविद्यालयात 'ऑनलाईन एज्युकेशन ' १८ मार्चपासून सुरू असून आयआयटी मुंबई व्हर्च्युअल लॅबच्या सहकार्याने प्रॅक्टिकल्स पार पडत असल्याची माहिती देण्यात आली आहे. एकंदरीतच कोरोना विषाणू साथ आणि लॉक डाऊनच्या पार्श्वभूमीवर महाविद्यालये बंद असल्याने विद्यार्थ्यांना घरूनच 'ऑन लाईन एज्युकेशन'ची सुविधा प्राप्त करून देण्यात आली आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.