जेजुरी(पुणे) - सोमवती अमस्येनिमित्त खंडेरायाची पालखी कऱ्हा स्नानासाठी जेजुरी गडावरून रवाना झाली आहे. जेजुरी गडावर सोमवती अमावस्या निमित्त भाविकांची अलोट गर्दी पहायला मिळत आहे. अखंड महाराष्ट्राचे कुलदैवत असलेल्या जेजुरी गडावर आज सोमवती अमावस्या यात्रा साजरी करण्यात येत आहे. यानिमित्त राज्यभरातून लाखो भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली. भंडाऱ्याच्या उधळणीनं संपूर्ण जेजुरी गड नाहून निघाला असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर दोन वर्षे यात्रा झाली नव्हती. यंदा दोन वर्षातून यात्रा भरल्याने भाविकांमध्ये मोठा उत्साह दिसला. सकाळी 11 वाजता गडावरून पालखीही कऱ्हा स्नानासाठी निघली आहे. देवसंस्थानच्यावतीने रस्त्याची सफाई, पिण्याचे पाणी, दर्शन व्यवस्था, मंडप व्यवस्था करण्यात आली आहे.दोन वर्षानंतर सोमवती यात्रा भाविकांसाठी खुली असणार असल्याने यात्रेला मोठी गर्दी होती. भंडारा- खोबरे, प्रसादाची दुकाने देखील सजली होती.
सोमवारी अमावस्या आली की जेजुरीत खंडोबाची सोमवती स्नानाचा कार्यक्रम असतो. यानिमित्ताने सोमवती यात्रा भरते. सोमवती स्नानाची व पालखी दर्शनाची संधी साधण्यासाठी भाविक मोठ्या संख्येने येतात. सकाळी अकरा वाजता गडावरून पालखी सोहळा मार्गस्थ झाला. दोन वर्षानंतर सोमवतीचा पालखी सोहळा यंदा रंगणार आहे.जेजुरीत यात्रेनिमित्त भाविक मोठया संख्येने आले होते. जेजुरीकरांनी यात्रेची जय्यत तयारी देखील केली होती.