पुणे : पुण्यातील संरक्षण संशोधन संस्थेचे (डीआरडीओ) चे संचालक प्रदीप कुरुलकर यांना कुरुलकर यांना अटक केल्यानंतर त्यांना 9 तारखेपर्यंत एटीएस कोठडी देण्यात आली होती. त्यांनतर 9 तारखेला त्यांना पुण्यातील शिवाजी नगर येथील न्यायालयात हजर करण्यात आले होती. यावेळी त्यांना 15 तारखेपर्यंत एटीएस कोठडी देण्यात आली आहे. डीआरडीओचे संचालक प्रदीप कुरुलकर यांचा तपास सुरू असताना वेगवेगळ्या बाबी समोर येत आहे.
ई मेलद्वारे पाकिस्तान गुप्तचर यंत्रणेच्या संपर्कात : कुरुलकर यांचा मोबाईल आणि लॅपटॉप यांची फॉरेन्सिक लॅबरेटरीच्या अहवालात धक्कादायक माहिती ही समोर आली आहे. हनीट्रॅपमध्ये कुरुलकर हे फक्त सोशल मीडिया व्हॉट्सॲप, फेसबुक याच्यावर संवाद साधत नव्हते, तर कुरुलकर हे ई मेलद्वारे पाकिस्तान गुप्तचर यंत्रणेच्या संपर्कात होते, असा अहवालात समोर आला आहे. जे काही ई मेलवर संभाषण तसेच देवाणघेवाण झाली आहे, ते देखील समोर आले आहे.
शासकीय पासपोर्टचा वापर : 9 तारखेच्या सुनावणीमध्ये एटीएस एक बाब पुढे आली आहे की, प्रदीप कुरलकर हे डीआरडीओच्या गेस्ट हाऊसमध्ये काही महिलांना भेटले आहे. त्या महिला नेमक्या कोण आहे? या महिलेची भेट का झाली? यामागील नेमके कारण काय आहे, याचा तपास देखील आत्ता एटीएसच्या माध्यमातून होत आहे. विशेष म्हणजे कुरुलकर यांनी शासकीय पासपोर्टचा देखील वापर केला आहे. त्याची माहिती देखील घेण्यात येत आहे. कुरुलकर या संपूर्ण काळात ते सहा देशांमध्ये जाऊन आले आहे .तेव्हा ते कोणाशी भेटले का? याचा तपास देखील एटीएसच्या माध्यमातून करण्यात येत आहे.
पाकिस्तानी हेरांना भेटल्याचा संशय : प्रदीप कुरुलकर यांनी वर्षभरात अनेकदा परदेशात दौरे केले आहे. या काळात ते पाकिस्तानी हेरांना भेटल्याचा देखील संशय आहे. जर त्यांनी भेट घेतली असेल, तर मग त्यांनी कोणती कार्यालयीन गोपनीय माहिती दिली का ? त्यासाठी कोणत्या इलेक्ट्रॉनिक उपकरणाचा वापर केला आहे का, याचा तपास देखील करण्यात येत आहे. या प्रकरणाच्या तपासात नवीन नवीन धक्कादायक माहिती समोर येत आहे.