ETV Bharat / state

"पुणे विभागातील कोरोना नियंत्रणात ठेवण्याची आता कसोटी"

कोरोनाबाधितांची आढळून आलेली संख्या पाहता कोरोना प्रतिबंधासाठी परिसरनिहाय सूक्ष्म नियोजन करा, असे सांगतानाच कोरोनाला नियंत्रित ठेवण्याची ही कसोटीची वेळ असल्याचे विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर यांनी यावेळी सांगितले.

dr deepak mhaisekar
डॉ. दिपक म्हैसेकर
author img

By

Published : May 27, 2020, 4:57 PM IST

पुणे - विभागातील पुणे, सांगली, सातारा, सोलापूर आणि कोल्हापूर या जिल्ह्यात कोरोना प्रतिबंधासाठी प्रशासनाकडून सुरू असलेल्या उपाययोजनांचा बुधवारी विभागीय आयुक्त डॉ. दिपक म्हैसेकर यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे आढावा घेतला. कंन्टेटमेंट झोनमध्ये रक्तदाब, मधुमेह तसेच इतर आजार असलेल्या रुग्णांची आरोग्य तपासणी करून गतीने उपचार सुरू करावेत, असे म्हैसेकर म्हणाले. कोरोना नियंत्रित ठेवण्याची ही कसोटीची वेळ असल्याचेही ते म्हणाले.

कोरोनाबाधितांची आढळून आलेली संख्या पाहता कोरोना प्रतिबंधासाठी परिसरनिहाय सूक्ष्म नियोजन करा, असे विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर यांनी यावेळी सांगितले. विभागीय आयुक्त कार्यालयातून विभागीय आयुक्त डॉ. म्हैसेकर यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे पुणे विभागातील जिल्हाधिकारी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी व कोरोना प्रतिबंधासाठी कार्यरत असलेले आरोग्य विभागाचे अधिकारी यांच्याकडून जिल्हानिहाय आढावा घेतला.

आपत्ती लक्षात घेता महानगरपालिका आणि इतर यंत्रणांमार्फत विविध प्रतिबंधात्मनक उपाययोजना करण्यामत येत आहेत. यासोबतच परिसरनिहाय सूक्ष्म नियोजन केल्यास अधिक प्रभावीपणे काम करणे सुलभ होईल आणि कोरोना प्रतिबंधासाठी उपयोग होईल. मृत्यूदर कमी करण्यासाठी अत्यंत काटेकोर नियोजन आवश्यक आहे. पल्स ऑक्सीमीटर, बीपी तपासणी तसेच शुगर तपासणीला प्राधान्य देण्यात यावे, आरोग्य सर्वेक्षण अचूक असावे व त्यातून एकही व्यक्ती सुटणार नाही, याची खबरदारी घ्यावी, अशा सूचनाही त्यांनी केल्या.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.