पुणे - मोठ्या आतड्यांमध्ये म्यूकरमायकोसिसचे विषाणू सापडणे ही काही वेगळी गोष्ट नाही. शक्यता अशी आहे, की या आजारातून जे बरे झालेले रुग्ण आहे आणि पूर्ण उपचार घेतले आहे, अशा रुग्णांमध्ये काही काळानंतर अशा पद्धतीचा धोका संभवू शकतो, अशी माहिती इंडियन मेडिकल असोसिएशनचे माजी अध्यक्ष डॉ.अविनाश भोंडवे यांनी दिली आहे. नुकतेच नागपूर येथे 70 वर्षीय रूग्णाच्या मोठ्या आतड्यांच्या शेवटच्या भागात म्यूकरमायकोसिसचे काही अंश सापडले आहे. त्याच पद्धतीने पुण्यातही एका रुग्णांमध्ये अशा पद्धतीचे अंश सापडले आहे.
'या' अवयवांमध्येही आढळू शकतात म्यूकरमायकोसिसचे अंश'
म्यूकरमायकोसिस हा आजार कोरोनातून बरे झालेल्यांना होत असतो. विशेषतः ज्यांना मधुमेह आहे किंवा ज्यांना स्ट्रॉईड दिली गेली आहे, अशा रुग्णांना कोरोनामधून बरे झाल्यांनतर होत असतो. मुख्यत: हा आजार नाकातून आणि तोंडातून पसरतो आणि त्यांनतर नाकाच्या हाडांमध्ये, सायनेसेसच्या हाडांमध्ये, त्याचप्रमाणे डोळ्यांमध्ये पसरतो आणि डोळ्यांमधून तो मेंदूकडेही पसरतो. याचे उपचार करताना शस्त्रक्रिया आणि २१ दिवस औषध घेतल्यानंतर हा आजार बरा होतो. परंतु अनेकदा असे लक्षात येत, की या आजाराचा काही अंश शिल्लक राहतो आणि हा शिल्लक राहिलेला अंश घशाधून पचनसंस्थेकडे पसरू शकतो. त्याच्यामुळे अन्ननलिका, जठर, लहान आतडे, मोठे आतडे यांच्यामध्येही तो सापडू शकतो, असेही यावेळी भोंडवे यांनी सांगितले आहे.
नागपुरातील 'या' रूग्णालयात सुरू आहेत उपचार
नागपुरात पोटाच्या आतड्यांतील काळ्या बुरशीच्या रुग्णांवर सध्या सेव्हनस्टार रुग्णालयात उपचार सुरू आहे. या व्यक्तींचा डावा डोळा हा निकामी झाला असून त्यांचावर अन्य एका खासगी रुग्णालयात शस्त्रक्रिया पार पडली होती. पण त्यांना उजवा डोळा आणि ओटीपोटात दुखत असल्याने बुरशीच्या संसर्गाने पुन्हा जकडले आहे. यामुळे त्यांना 19 जुलैला सेव्हनस्टार रुग्णलायत डॉ. प्रशांत राहाटे यांच्याकडे दाखल करण्यात आले. प्रसिद्ध लॅप्रोस्कोपीक आणि एंडोस्कोपीक तज्ज्ञ डॉ. प्रशांत राहाटे यांनी कोलोनोस्कॉपी केली असता काहीच आढळून आले नाही. यात त्यांनतरही पोटात दुखत असल्याने पोटावर सुजन आल्याने लॅप्रोटॉमी केले असता पोटाच्या आतील आतड्यांच्या शेवटच्या भागात(सिगमाईड कोलनवर) सहा इंचाचा भागात काळी बुरशी आढळून आली. यावर डॉ. प्रशांत राहाटे यांच्या देखरेखीत रुग्णांवर उपचार सुरू असल्याची माहिती पुढे आली आहे. तर दुसरीकडे असाच एक रूग्ण पुण्यात आढळल्याची माहिती आहे. या प्रकारावर तज्ज्ञ डॉ. अविनाश भोंडवे यांनीही चिंता व्यक्त केली आहे.
हेही वाचा -नागपुरात आढळला आतड्यांमध्ये काळ्या बुरशीचा संसर्ग झालेला रूग्ण!