पुणे - देहू येथे भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी राजकीय वर्तुळात खळबळ माजेल, असे विधान केले असून अनेक तर्कवितर्क लावण्यात येत आहेत. मला माजी मंत्री म्हणू नका, दोन-तीन दिवसात कळेल, असे विधान करत त्यांनी राज्याच्या राजकारणात खळबळ उडेल, असे संकेतच दिले आहे. देहूगाव येथे एका कार्यक्रमात ते बोलत होते.
देहूगाव येथे एका खासगी दुकाने उद्घाटन करण्यासाठी चंद्रकांत पाटील आले पोहोचले होते. त्यावेळी सुरू असलेल्या उद्घाटन कार्यक्रमाच्या मंचावरुन सुत्रसंचालकाने माजी मंत्री चंद्रकांत पाटील, असा वारंवार उल्लेख केला. त्यावर माजी मंत्री म्हणून नका, दोन-तीन दिवसांत कळेल, असे म्हणत भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी सूचक विधान केले आहे.
हेही वाचा - पुण्यातील भाऊ इंडस्ट्रीजमधील एका कंपनीत भीषण आग; एकाचा मृत्यू