ETV Bharat / state

बारामतीमधील कोरोना हॉटस्पॉट गावात लग्न समारंभ व अन्य कार्यक्रमांना परवानगी देऊ नका - जिल्हाधिकारी

कोरोना तपासणी वाढवा, हॉटस्पॉट असलेल्या गावात लग्न समारंभ व इतर कार्यक्रमाला परवानगी देऊ नये. तसेच संभाव्य तिसऱ्या लाटेचा धोका लक्षात घेवून आरोग्य यंत्रणा अधिक सक्षम करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी दिले.

baramati
baramati
author img

By

Published : Jun 27, 2021, 3:50 PM IST

बारामती - कोरोनाचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी यंत्रणा प्रभावीपणे राबवा. बारामती ग्रामीण भागात कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. हॉटस्पॉट ठिकाणे कशी कमी करता येतील, याकडे लक्ष द्या. कोरोना तपासणी वाढवा, हॉटस्पॉट असलेल्या गावात लग्न समारंभ व इतर कार्यक्रमाला परवानगी देऊ नये. तसेच संभाव्य तिसऱ्या लाटेचा धोका लक्षात घेवून आरोग्य यंत्रणा अधिक सक्षम करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी दिले. बारामती येथील तहसिल कार्यालयात कोविड -19 विषाणू प्रादुर्भावाची परिस्थिती आणि उपाययोजनांचा आढावा जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी आज घेतला. त्यावेळी ते बोलत होते.

रुग्णालयातील फायर ऑडिट वेळेत पूर्ण करा -

यावेळी जिल्हाधिकारी देशमुख म्हणाले की, हॉटस्पॉट असलेल्या गावातील रुग्णसंख्या पंधरा दिवसांत कमी करण्यासाठी प्रयत्न करा. तसेच तालुक्यातील प्रत्येक रुग्णालयातील फायर ऑडिट वेळेत पूर्ण करा. शासकीय रुग्णालयातील प्रस्तावित असलेले ऑक्सिजन ओटीचे काम लवकरात लवकर पूर्ण झाले पाहिजे. प्रत्येक रुग्णालयामध्ये सिलेंडरच्या माध्यमातून ऑक्सिजनचा पुरेसा साठा करून ठेवणे आवश्यक आहे. त्याचबरोबर म्युकरमायकोसिसच्या रुग्णांवर वेळेत आणि योग्य ते उपचार तात्काळ होणे गरजेचे आहे. सर्व रुग्णालयात ऑक्सिजन बेड्सची व्यवस्था सुनिश्चित करणे. म्युकरमायकोसिसच्या उपचारासाठी वापरण्यात येणाऱ्या इंजेक्शनचे योग्य नियोजन करणे आवश्यक आहे. गर्दी जर कमी होत नसेल तर बंधने लावणे आवश्यक आहे. सुरक्षित मातृत्व योजनेंतर्गत दर महिन्याच्या 9 तारखेला गरोदर महिलांची तपासणी करण्यात यावी, हाय अलर्ट गावांची संख्या मर्यादित ठेवणे आवश्यक आहे.

गावस्तरावर समिती व यंत्रणा उभारावी -

यावेळी जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद म्हणाले की, लहान मुलांच्या पालकांचे लसीकरण प्राधान्याने करून घ्यावे, गरोदर महिलांची यादी तयार करावी. त्याची जबाबदारी आशा वर्करवर सोपवावी. गरोदर महिलांची तपासणी वेळेत पूर्ण करून त्यांना रूग्णालयात योग्य वेळी दाखल करण्याचे नियोजन करण्यात यावे. कोरोना रूग्णांची संख्या कोठे वाढत आहे त्याचे वार्ड बाय वार्ड मॅपिंग करून योग्य नियोजन करणे गरजेचे आहे. रूग्णालयातील उपकरणांचे योग्य व्यवस्थापन होणे देखील आवश्यक आहे. उपकरणांची इन्व्हेंटरी तयार करून नोंदी घ्या, त्याचा उपयोग कसा करावा याबाबत कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देणे आवश्यक आहे. जी गावे कायमस्वरूपी हॉट स्पॉट होत आहेत तेथे गावस्थरावरील समिती व यंत्रणा तयार करावी. जेणेकरून तेथे रूग्णांची संख्या कमी होईल. ज्या गावामध्ये समिती कार्यान्वित आहे तेथील रोजच्या परिस्थितीवर नजर ठेवून तपासणी करा. असेही ते यावेळी म्हणाले.उपविभागीय अधिकारी दादासाहेब कांबळे यांनी तालुक्यामधील हॉट स्पॉट असलेल्या गावांची तसेच शहर व ग्रामीण भागातील कोरोना नियंत्रणासाठीच्या उपाययोजना, संभाव्य तिसऱ्या लाटेचा मुकाबला करण्याची तयारी, ऑक्सिजन, म्युकरमायकोसिसच्या औषधांचा पुरवठा सुरळीत होण्यासाठी करण्यात येणाऱ्या उपाययोजनांबाबत सादरीकरणाव्दारे माहिती दिली. बैठकीला विविध यंत्रणांचे प्रमुख अधिकारी उपस्थित होते.

विकास कामांचा आढावा -

कोरोना आढावा बैठकीनंतर जिल्हाधिकारी डॉ. देशमुख यांनी बारामतीमधील सुरू असलेल्या विविध विकासकामांचा आढावा घेवून संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांकडून कामाची सद्यस्थिती जाणून घेतली. यावेळी जिल्हाधिकारी डॉ. देशमुख यांनी विकासकामांच्या सर्व प्रकारच्या मान्यता घेणे, निविदा सूचना काढणे, कामांचा आराखडा तयार करणे इत्यादी कामे वेळेत पूर्ण करण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या. या बैठकीनंतर जिल्हाधिकारी डॉ. देशमुख यांनी क्रीडा संकुल, कन्हेरी येथील रोपवाटिका व शिवसृष्टी, कऱ्हा नदी सुधार प्रकल्प, रूई ग्रामीण रुग्णालय येथील मोड्युलर रुग्णालय, महिला रुग्णालय, शासकीय आयुर्वेदीक मेडीकल कॉलेजची मेडद येथील नियोजित जागा इत्यादी विकासकामांची पहाणी केली. पाहणी वेळी खासदार सुप्रिंया सुळे, टाटा हॉस्पिटल मुंबईचे डॉ. श्रीखंडे, उपविभागीय अधिकारी दादासाहेब कांबळे तसेच संबंधित विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.