पुणे - गणपती बाप्पा मोरया... मंगलमूर्ती मोरयाच्या जयघोषात घरोघरी आज गणरायाचे आगमन झाले. गणरायाचे आगमन होताच विधीवत प्रतिष्ठापना करण्यात आली. लाडक्या बाप्पाच्या आगमनामुळे सर्वत्र मंगलमय, आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. पुण्याच्या श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरात ही आज सकाळपासून बाप्पाच्या आगमनाची तयारी सुरू होती. भक्त मंडळी गणरायाच्या आगमनाच्या तयारीत असताना पोलीस दलही सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून मंदिराच्या परिसराची छाननी करत होते. यासाठी बॉम्बशोधक आणि नाशक पथकही तैनात करण्यात आले होते. या पथकातील एक श्वान गणपत्ती बाप्पासमोर नतमस्तक झाले. हे दृश्य एकाने आपल्या कॅमेऱ्यात कैद केले. याचा व्हिडिओ सद्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
यंदा कोरोनाचे सावट असल्याने गणेशोत्सव साधेपणाने साजरा होत आहे. गेल्या काही दिवसांपासून राज्यभरात सुरू असलेला पावसाचा जोर शुक्रवारी आणि आजही सुरूच असल्याचं पहायला मिळत आहे. मात्र, असे असले तरी नागरिकांनी बाप्पाच्या तयारी साठीचे सामान खरेदी केली. अनेकांनी शुक्रवारी रात्रीच बाप्पा घरी आणला आणि सकाळी विधीवत प्रतिष्ठापना, पूजा केली. दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरात आज सकाळपासून जोरदार तयारी सुरू होती. या दरम्यान, सुरक्षेसाठी मोठ्ठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. यात बॉम्बशोधक आणि नाशक पथकही मंदिर परिसराची छाननी करत होते. या दरम्यान, पथकातील एक श्वान गणपत्ती बाप्पासमोर नतमस्तक झाले.
दगडूशेट हलवाई गणपती मंडळाची स्थापना १८९३ मध्ये श्रीमंत दगडूशेठ हलवाई यांनी केली. १९६८ साली दगडूशेठ गणपतीची मूर्ती मंडळाने तयार करून घेतली. प्रसिद्ध शिल्पकार, मूर्तिकार आणि यंत्रविज्ञेचे अभ्यासक शंकरअप्पा शिल्पी यांच्या कल्पनेतून ही मूर्ती पूर्ण झाली.
हेही वाचा - गणपती बाप्पा मोरया...मंगल मूर्ती मोरया...मानाच्या पहिल्या गणपती श्री कसबा गणपतीचे पालखीतून आगमन
हेही वाचा - पुण्यात ढोल-ताशांविना फक्त गणपती बाप्पा मोरयाच्या जयघोषात मानाच्या गणपतींचे आगमन