पुणे : दोन वर्षापूर्वी जगभरात कोरोना विषाणूने थैमान घातले होते. आत्ता कुठेतरी सर्वकाही सुरळीत होत असताना कोरोनासारखी लक्षणे असलेल्या नव्या व्हायरसमुळे भारतात दोन जणांचा मृत्यू झाला आहे. यामुळे चींतेचे वातावरण निर्माण झाले आहे. हा व्हायरस H3N2 असून याचे देशभरात 90 हून अधिक रुग्ण सापडले आहे. याबाबत इंडीयन मेडिकल असोसएशनचे माजी अध्यक्ष डॉ.अविनाश भोंडवे यांना विचारले असता ते म्हणाले की, या H3N2 हा नवीन व्हायरस नसून हा जुनाच व्हायरस असून यात घाबरण्याच कोणतेही कारण नसल्याचं यावेळी भोंडवे म्हणाले.
कसा आहे विषाणू : डॉ.अविनाश भोंडवे पुढे म्हणाले की, गेल्या काही दिवसांपासुन म्हणजेच फेब्रुवारी महिन्याच्या अखेरपासून ते मार्च महिन्याच्या सुरवातीपर्यंत सर्दी, खोखला, ताप या श्वसन मार्गाच्या असंख्य रुग्ण हे होते. यात नेहेमीच्या संसर्गापेक्षा काहीसे वेगळे होते. यांच्यात सर्दी, खोकला तसेच ताप होता. पण जो खोकला होता तो जास्त दिवस राहत होता. यांची तपासणी केल्यानंतर कळले की या रुग्णांना H3N2 हा संसर्ग झाला आहे. हा विषाणू इनफ्ल्यूएनसा व्हायरसचा व्हेरियंट आहे, असे ते म्हणाले.
व्हायरसमुळे 2 जणांचे मृत्यू : ते पुढे म्हणाले की, हा व्हायरस नवीन नसून गेली अनेक वर्ष हा व्हायरस धुमाकूळ घालत आहे. तसेच या व्हायरसची 1968 साली साथ देखील आली होती. अमेरिकेत देखील या व्हायरसचे मोठ्या प्रमाणावर रुग्ण हे आढळून आले होते. आपल्याकडे देखील हा व्हायरस आत्ता आला असून याच मुख्य कारण म्हणजे परदेशातून हा येत असतो. पण आत्ता आपल्याकडे अस सांगितले जाते आहे की याचे 90 रुग्ण असून 2 जणांचे मृत्यू देखील झाले आहे, असे देखील यावेळी भोंडवे म्हणाले.
काळजी घेण्याचा दिला सल्ला : ते पुढे म्हणाले की, आपण पाहिले तर सध्या घरोघरी सर्दी खोकल्याचे रुग्ण हे आढळून येत आहे. जसे कोरोनामध्ये रुग्णांची तपासणी केली जाते. तसे या व्हायरस मध्ये कुठलीही तपासणी केली जात नाही. नक्कीच या व्हायरसचे रुग्ण हे मोठ्या प्रमाणात असतील पण याच्यापासून कोणीही घाबरून जाऊ नये, जी खबरदारी कोरोना काळात घेण्यात आली होती. तीच खबरदारी आत्ता देखील घ्यावी लागणार आहे, असे देखील यावेळी डॉ.अविनाश भोंडवे म्हणाले.
काळजी घेण्याचे आवाहन : H3N2 हा व्हायरस मध्ये खोकला आणि सर्दी, आणि अगदी सौम्य कोविडची सामान्य लक्षणे दिसून येतात. यात लोकांना ताप खोकला घसा खवखवणे अंगदुखी डोकेदुखी थंडी वाजून येणे आणि थकवा ही लक्षणे दिसतात.यामुळे कोणीही घाबरून जाऊ नये, असे देखील यावेळी डॉ.अविनाश भोंडवे म्हणाले.
हेही वाचा : H3N2 Virus : भारतात H3N2 व्हायरसचा शिरकाव; जाणून घ्या, उपचार आणि मार्गदर्शक सूचना