पुणे Diwali Festival 2023 : सर्वसामान्य नागरिकांची दिवाळी (Diwali) गोड व्हावी या उद्देशाने 'दि पूना मर्चंट्स चेंबरकडून' रास्त भावात लाडू-चिवडा उपक्रमाला सुरुवात करण्यात आली आहे. यंदा या उपक्रमाचे 36 वे वर्ष आहे. मागील तीन दिवसांपासून या उपक्रमाला सुरुवात झाली आहे. विशेष बाब म्हणजे यंदा साडे तीन लाख किलो लाडू चिवडा बनविण्यात येणार असल्याचं अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.
असा असणार भाव : या वर्षी लाडू-चिवड्याच्या प्रति किलोचा भाव हा 160 रुपेय आहे आहे. तसेच विशेष म्हणजे यंदा अर्धा किलोच देखील पॅकेट्स देखील उपलब्ध करण्यात आले आहे. या आर्ध्या कीलोच भाव 80 रुपये असल्याची माहिती, 'दी पूना मर्चंट्स चेंबर'चे पदाधिकारी प्रवीण चोरबोलो यांनी दिली.
यंदा उपक्रमाचे 36 वे वर्ष : 'दी पूना मर्चंट्स चेंबर'च्या वतीनं गेल्या 35 वर्षापासून रास्त भावात लाडू चिवडा - विक्री केली जात आहे. सर्वसामान्य नागरिकांची दिवाळी गोड व्हावी. तसेच नागरिकांना चांगल्या दर्जाचं आणि कमी किंमतीमध्ये लाडू चिवडा उपलब्ध व्हावा म्हणून चेबरच्या वतीनं रास्त भावात लाडू चिवडा विक्री केली जात आहे. या उपक्रमाची 'गिनीज बुक ऑफ रेकॉर्ड' आणि 'लिंबका बुक ऑफ रेकॉर्ड' मध्ये देखील नोंद झाली आहे.
तब्बल 700 हून अधिक कामगार : यंदाच्या या उपक्रमात तब्बल 700 हून अधिक कामगार हे काम करत आहे. या सर्व कामगारांची मेडीकल तपासणी करण्यात आली आहे. तसेच या उपक्रमाच्या माध्यमातून या महिला व पुरुष कामगारांना काम देखील उपलब्ध होत आहे. तसेच चेंबरच्या सदस्यांच्या देखरेखीखाली उत्कृष्ट पॅकिंगमध्ये तसेच स्वच्छ वातावरणात लाडू-चिवडा तयार केला जात आहे. राजस्थान येथील पप्पू महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली जयजिनेंद्र प्रतिष्ठान येथे अहोरात्र लाडू, चिवडा तयार करण्याचं काम सुरू करण्यात आलं आहे.
शहरात 25 ठिकाणी विक्री केंद्रे : सर्वसामान्य नागरिकांना सहज लाडू - चिवडा उपलब्ध व्हाव म्हणून चेंबरच्या वतीनं शहरात जवळपास 25 ठिकाणी विक्री केंद्र आहेत. त्या ठिकाणी लाडू-चिवडा विक्रीस उपलब्ध करून देण्यात आलं आहे. 'दी पूना मर्चंट्स चेंबर'चं मार्केट यार्डातील व्यापार भवन, ग्राहक पेठ (टिळक रस्ता), आझाद मित्र मंडळ (पुष्पमंगल कार्यालय, बिबवेवाडी), श्रीराम जनरल स्टाेअर्स (चिंचवड), निखील ग्रोसरी वर्ल्ड (आळंदी). विजय ट्रेडिंग कंपनी (काेंढवा), श्री वर्धमान जैन श्रावक संघ (आकुर्डी), श्री साई सामाजिक सेवा (कसबा पेठ), श्री लक्ष्मी ब्युटी चाॅईस लेडीज शाॅपी (खडकी), सह्याद्री सेवा प्रतिष्ठान (पर्वती), दिपिका दीपक नेवे (खराडी) अशा जवळपास 25 ठिकाणी लाडू-चिवडा विक्रीस उपलब्ध करून देण्यात येणार आहे.
हेही वाचा -