ETV Bharat / state

Diwali 2023 : दिवाळीत फटाके फोडण्याची वेळ दोन तासांवर, पहाटे फटाके वाजवायचेच नाही - उच्च न्यायालय - घातक फटाक्यांना पूर्ण बंदी

Diwali 2023 : वाढत्या वायू प्रदुषणामुळं उच्च न्यायालयानं आज आपल्या मागच्या आदेशात बदल केला आहे. वायू प्रदूषणाची परिस्थिती लक्षात घेता दिवाळीत रात्री 8 ते 10 या वेळेतच फटाके फोडता येतील, असे निर्देश न्यायालयानं दिले आहेत. तसंच घातक फटाक्याना पूर्ण बंदी घालण्यात आली आहे.

Diwali 2023
Diwali 2023
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Nov 10, 2023, 9:18 PM IST

Updated : Nov 10, 2023, 10:33 PM IST

मुंबई Diwali 2023 : राज्याला प्रदूषणापासून वाचवण्यासाठी आज मुंबई उच्च न्यायालयानं कडक आदेश दिले आहेत. रात्री 8 ते 10 या वेळेतच फटाके फोडवे, असे आदेश काढण्यात आले आहेत. तसंच 19 नोव्हेंबरपर्यंत मुंबईत बांधकाम 'डेब्रिज' नेण्यास पूर्ण बंदी असणार आहे. मुख्य न्यायमूर्ती डी के उपाध्याय, न्यायमूर्ती जी एस कुलकर्णी यांच्या खंडपीठानं 6 नोव्हेंबर रोजी महाराष्ट्रातील सर्व महापालिका प्राधिकरणांच्या हद्दीत संध्याकाळी 7 ते 10 या वेळेत फटाके फोडण्याची परवानगी दिली होती. त्यानंतर न्यायालयानं आज सुधारीत आदेश दिले आहेत. या प्रकरणाची पुढील सुनावणी 11 डिसेंबर रोजी होणार आहे.

दिवाळीत रात्री 8 ते 10 या वेळेतच फटाके फोडावेत, असे निर्देश मुंबई उच्च न्यायालयाने दिले आहेत. न्यायालयाच्या निर्देशांचं पालन सर्वांनी करावं. तसंच कमीत कमी वायू तसंच ध्वनी प्रदूषण करणारे फटाके फोडावेत - डॉ. इकबाल सिंह चहल, आयुक्त BMC

रात्री 8 ते 10 या वेळेतच फटाके फोडा : मुंबईतील प्रदूषणाबाबत मुंबई उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल करण्यात आल्या आहेत. या जनहित याचिकेवर आज खंडपीठांसमोर सुनावणी झाली. दरम्यान, खंडपीठानं फटाके फक्त रात्री 8 ते 10 वाजेपर्यंत फोडले जावे असं आदेश सुनावले आहेत. उच्च न्यायालयाच्या पुढील आदेशापर्यंत हा आदेश लागू राहतील.

घातक फटाक्यांना पूर्ण बंदी : फटाक्यांबाबत सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार मुंबई उच्च न्यायालयानंही त्याच आदेशाचं पालन केल्यानं आता मुंबईत रात्री 8 ते 10 या वेळेतचं फटाके फोडता येणार आहेत. न्यायालयाचा हा आदेश मुंबईसह संपूर्ण महाराष्ट्रात लागू राहील. बेरियम, लिथियम सारखी घातक रसायने असलेल्या फटाक्यांवर तात्काळ बंदी घालण्यात येणार आहे.

डेब्रिजवर पुन्हा कडक नियंत्रण : बांधकामाबाबत, मुंबई उच्च न्यायालयानं आपल्या मागील आदेशात 10 नोव्हेंबरपर्यंत बांधकामाचा कचरा वाहून नेण्यास बंदी घातली होती. आता ती 19 नोव्हेंबर 2023 पर्यंत वाढवण्यात आली आहे. मात्र बांधकामावर कोणतीही बंदी असणार नाही.

हेही वाचा -

  1. Mumbai Air Pollution: मुंबईच्या हवेची गुणवत्ता घसरली; वायू प्रदूषणामुळं लहान मुलांना धोका? अशी घ्या काळजी
  2. Mumbai Air Pollution Issue: प्रदूषणापासून मुंबईला वाचवण्यासाठी मुंबई उच्च न्यायालयाचे कठोर आदेश
  3. Mumbai Air Quality Index : मुंबईतील वायू प्रदूषणात वाढ; आजार बळवण्याची शक्यता, 'अशी' घ्या काळजी

Last Updated : Nov 10, 2023, 10:33 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.