ETV Bharat / state

सर्व दुकाने नेहमीप्रमाणे सुरू राहतील, येवले चहाचे संचालक नवनाथ यांचे स्पष्टीकरण - येवले अमृततुल्य चहा

आम्हाला ग्राहकांच्या आरोग्याशी खेळण्याचा अधिकार नाही. ग्राहकांच्या आरोग्यावर परिणाम होईल, असा कुठलाही पदार्थ आम्ही चहामध्ये वापरत नाही,असे स्पष्टीकरण येवले चहाचे संचालक नवनाथ येवले यांनी दिले.

नवनाथ येवले, संचालक येवले चहा
author img

By

Published : Sep 25, 2019, 8:57 PM IST

पुणे - ग्राहकांच्या आरोग्यावर परिणाम होईल, असा कुठलाही पदार्थ आम्ही चहामध्ये वापरत नाही. अन्न व औषध प्रशासनाने आमच्या कारखान्याला दिलेल्या भेटीमध्ये कुठलाही घातक पदार्थ त्यांना आढळून आला नाही. आमची सर्व दुकाने नेहमीप्रमाणे सुरू राहतील, असे स्पष्टीकरण येवले चहाचे संचालक नवनाथ येवले यांनी दिले.

येवले चहाचे संचालक नवनाथ येवले यांचे स्पष्टीकरण

काही दिवसांपासून सोशल मीडियावर येवले चहामध्ये 'मेलामाईन' नावाचा घातक पदार्थ वापरला जात असल्याचा मेसेज व्हायरल होत आहे. मात्र, आमच्या चहामध्ये असा कुठलाही पदार्थ वापरला जात नाही. आम्हाला ग्राहकांच्या आरोग्याशी खेळण्याचा अधिकार नाही. अन्न व औषध प्रशासनाला आमच्या पॅकिंग संदर्भात काही त्रुटी आढळल्या. त्याची पूर्तता आम्ही केली आहे, अशी माहिती नवनाथ येवले यांनी दिली.

हेही वाचा - बडा किवा छोटा मासा असेल अडकला तो अडकला - रावसाहेब दानवे

काही दिवसांपूर्वी येवले चहाच्या कोंढव्यातील गोडाऊनवर अन्न व औषध प्रशासनाच्या (एफडीए) अधिकाऱ्यांनी छापा टाकला होता. त्यांना काही त्रुटी आढळल्याने येवले उत्पादन करत असलेल्या चहा पावडर, चहा मसाला या उत्पादनांवर पुढील आदेश येईपर्यंत बंदी घालण्यात आली आहे.

Intro:ग्राहकांच्या आरोग्यावर परिणाम होईल असा कुठलाही पदार्थ आम्ही चहामध्ये वापरत नाही..अन्न व औषध प्रशासनाने जेव्हा आमचा कारखान्यावर भेट दिली. तेव्हा कुठलाही घातक पदार्थ त्यांना आढळून आला नाही. पॅकिंग संदर्भात काही त्रुटी होत्या.. त्याची पूर्तता आम्ही केली..त्यामुळे आमची सर्व दुकाने नेहमीप्रमाणे सुरू राहतील असे स्पष्टीकरण येवले चहाचे संचालक नवनाथ येवले यांनी दिले..Body:नवनाथ येवले म्हणाले, काही दिवसांपासून सोशल मीडियावर येवले चहामध्ये 'मेलामाईन' नावाचा घातक पदार्थ वापरला जात असल्याचा मेसेज व्हा यरल होतो..परंतु आमच्या चहामध्ये असा कुठलाही पदार्थ वापरला जात नाही..आमच्या ग्राहकांच्या आरोग्याशी खेळण्याचा कोणताही अधिकार आम्हाला नाही. अन्न व औषध प्रशासनाने जेव्हा आमच्या कारखान्यावर भेट दिली तेव्हा कुठलाही घातक पदार्थ त्यांना आढळला नाही. पॅकिंग संदर्भात काही त्रुटी होत्या.. त्याची पूर्तता आम्ही केली..ग्राहकांनी कुठल्याही प्रकारच्या अफवांवर विश्वास ठेवू नये..आमची सर्व दुकाने नेहमीप्रमाणे सुरू राहतील. Conclusion:येवले चहाच्या कोंढव्यातील गोडावूनवर एफडीएच्या अधिकाऱ्यांनी छापा टाकला असता त्यांना काही त्रुटी आढळल्या होत्या...त्यानंतर येवले उत्पादन करीत असलेल्या चहा पावडर, चहाच्या मसाल्याच्या उत्पादनावर पुढील आदेश येईपर्यंत बंदी घालण्यात आली आहे.सहा लाख रुपयांचा साठाही जप्त करण्यात आला आहे...

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.