ETV Bharat / state

हुतात्मा राजगुरु वाड्यावर दिपोत्सव साजरा; जाणीव परिवाराचे आयोजन

हुतात्मा राजगुरू यांच्या राजगुरुनगर येथील जन्मस्थळी दिपावली निमित्ताने जाणीव परिवार या युवा संघटनेच्यावतीने 'एक दिवा हुतात्म्यांसाठी' या उपक्रम साजरा करण्यात आला.

dipotsav celebration at hutatma rajguru wada in rajgurunagar
हुतात्मा राजगुरु वाड्यावर दिपोत्सव साजरा; जाणीव परिवाराचे आयोजन
author img

By

Published : Nov 18, 2020, 2:38 AM IST

राजगुरुनगर (पुणे)- भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील थोर क्रांतिकारक हुतात्मा राजगुरू यांच्या राजगुरुनगर येथील जन्मस्थळी दिपावली निमित्ताने जाणीव परिवार या संघटनेच्यावतीने 'एक दिवा हुतात्म्यांसाठी' हा उपक्रम साजरा करण्यात आला. यावेळी राजगुरू वाडा हजारो दिव्यांनी उजळून निघाला होता.

हुतात्मा राजगुरु वाड्यावर दिपोत्सव साजरा
सहा वर्षांपासून दिपोत्सव-

राजगुरुनगर येथील जाणीव परिवार ग्रुपच्या माध्यमातून गेल्या सहा वर्षांपासून हुतात्मा राजगुरू यांचे जन्मस्थळ असलेल्या राष्ट्रीय स्मारकात दिपावली निमित्ताने दिपोत्सवाचे आयोजन करण्यात येते. यावर्षी राष्ट्रीय स्मारकाजवळील मैेदानात या दिपोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. शहरातील नागरिक विशेषतः तरुण तरुणी या उपक्रमात मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. यंदा दिवाळीवर कोरोनाचे संकट असल्याने हा सण सर्वत्र साधेपणाने साजरा करण्यात येत आहे. मात्र, आपल्या गावातील हुतात्म्याने देशाच्या स्वातंत्र्यासाठी आपल्या प्राणाची आहुती दिली. त्या क्रांतीकारकाचे स्मरण म्हणून राजगुरुनगर येथील राजगुरु वाड्यावर दिपोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.

'एक दिवा हुतात्म्यांसाठी' -

या जाणीव परिवार ग्रुपच्या आवाहनाला प्रतिसाद देत शहरातील युवक-युवतींनी मोठा संख्येने या उपक्रमात सहभाग घेतला होता. शहरातील असंख्य नागरिक हा दिपोत्सव सोहळा पाहण्यासाठी उपस्थित होते. जाणीव परिवारातील अतिक सय्यद, अमोल वाळुंज, शैलेंद्र बकरे, अजिंक्य बकरे, ऋषिकेश सारडा, रोहित बेलसरे, श्रेयस अहिरे, ओंकार कहाणे, सौरभ लुणावत, प्रसाद निंबाळकर, हितेश शेटे अभिजीत घुमटकर, संदिश शिंदेकर, सुमित खन्ना, सुजित डावरे, श्रीराज चव्हाण, अमर टाटिया, मच्छिद्र राक्षे, अभिजीत तापकीर, मयूर पाचारणे, रोहित बोरुडे आदीनी संयोजन केले. यावेळी राजगुरू परिवारातील वंशज विलास राजगुरु यांनी या उपक्रमाला भेट देत मार्गदर्शन केले. मयूर पाचारणे यांनी बासरी तर संदिश शिंदेकर यांनी ढोलकी वादन करीत देशभक्ती व भावगीते सादर केले.

हेही वाचा- जळगावात पत्नीच्या मृत्यूनंतर तरुणाची रेल्वेखाली आत्महत्या, फेसबुक लाईव्ह करुन घेतला सर्वांचा निरोप

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.