ETV Bharat / state

Gram Panchayat Election : दिलीप वळसे पाटील यांची गड आला पण सिंह गेला अशी अवस्था, गावात सरपंचपदी शिंदे गटाचा उमेदवार विजयी - रविंद्र वळसे पाटील

Gram Panchayat Election Result 2023 : पुणे जिल्ह्यातील सर्वात प्रतिष्ठेची आणि सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील (Dilip Walse Patil) यांच्या निरगुडसर गावची ग्रामपंचायत (NIrgudsar Gram Panchayat) निवडणुकीत ७३ वर्षांच्या सत्तेला सुरुंग लागला आहे. शिंदे गटाने वळसे पाटील यांना धोबीपछाड देत ७३ वर्षांची सत्ता उधळून लावली आहे. त्यामुळे वळसे पाटील आणि अजित पवार गटाला मोठा धक्का बसला आहे.

Gram Panchayat Election Result 2023
ग्रामपंचायत निवडणूक निकाल 2023
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Nov 6, 2023, 3:38 PM IST

पुणे आंबेगाव Gram Panchayat Election Result 2023 : राज्यभरातील 2 हजार 359 ग्रामपंचायतीचा निकाल आज लागत आहे. या निवडणुकीत कुणाचं वर्चस्व असणार याकडे संपूर्ण महाराष्ट्रात लक्ष लागलेलं आहे. राज्यातील अनेक ग्रामपंचायतीच्या निवडणुकीचे निकाल यायला सुरुवात झाली आहे. दरम्यान, पुणे जिल्ह्यातील आंबेगाव तालुक्यात अजित पवार गटाला मोठा धक्का बसला आहे. सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील (Dilip Walse Patil) यांच्या निरगुडसर गावच्या ग्रामपंचायतीमध्ये (Grampanchayt NIrgudsar Election Result) गेल्या वर्षांपासून त्यांची सत्ता होती. मात्र यंदा सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील यांना धक्का बसला असून ७३ वर्षांच्या सत्तेला सुरुंग लावला आहे.

रवी वळसे 135 मतांनी विजयी : सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या निरगुडसर गावी सरपंच पदाच्या निवडणुकीत शिवसेना पक्ष शिंदे गटाचे सरपंच म्हणून रविंद्र वळसे पाटील निवडून आले आहे. त्याचबरोबर शिवसेना पक्षाचे तीन सदस्य निवडून देखील आले आहेत. निरगुडसर ग्राम पंचायतीच्या चुरशीच्या झालेल्या लढतीत शिंदे गटाचे उमेदवार विजयी झाले आहेत. सरपंचपदासाठी शिंदे गटाचे रवी वळसे पाटील 135 मतांनी विजयी झाले आहे. पुणे जिल्ह्यात अनेक ठिकाणी अजित पवार गटाचे उमेदवार विजयी होत आहे. परंतु आंबेगावात त्यांच्या गटाला पराभव पत्करावा लागला. निरगुडसर गावात शिंदे गटाचे सरपंच रवी वळसे पाटील विजयी झाले. त्यामुळे गड आला पण सिंह गेला अशी त्यांची अवस्था झाली आहे. या ठिकाणी एकूण 13 पैकी 3 सदस्य शिंदे गटाचे तर 10 सदस्य राष्ट्रवादी काँग्रेसचे विजय झाले. रवी वळसे यांना 1483 तर राष्ट्रवादीचे संतोष टाव्हारे यांना 1348 मते मिळाली.

निरगुडसर येथे शिंदे गटाने सुरुंग लागला : महाराष्ट्रात काही महिन्यांपूर्वी झालेल्या सत्ताकारणामुळे अनेक नेते, स्थानिक कार्यकर्ते आणि नागरिक अजूनही संभ्रमात आहेत. राष्ट्रवादीत फूट पडल्यानंतर शरद पवार यांचे निकटवर्तीय मानले जाणारे आमदार दिलीप वळसे पाटील यांनी अजित पवार यांच्यासोबत जाणे पसंत केले होते. त्यामुळे शरद पवार यांचा सर्वात विश्वासू नेते म्हणून वळसे पाटील यांची ओळख होती. मात्र वळसे पाटील यांच्या निर्णयामुळे कुठे तरी त्यांच्या या प्रतिमेला फटका बसल्याचं बोललं जात आहे. दिलीप वळसे पाटील यांच्या ७३ वर्षांच्या सत्तेला निरगुडसर येथे शिंदे गटाने सुरुंग लागला आहे.

बारामतीत अजित पवार यांचं वर्चस्व : बारामती आणि इंदापूर या दोन तालुक्यातील ग्रामपंचायती या यंदाच्या निवडणुकीत महत्वचाच्या मानल्या जात होत्या. बारामतीत अजित पवार यांनी नेहमीप्रमाणे आपले वर्चस्व दाखवत ग्रामपंचायतींवर सत्ता काबीज केली आहे. मात्र दिलीप वळसे पाटील यांना सत्ता राखण्यात यश आलेलं नाही. आढळराव पाटील यांना दिलीप वळसे पाटील यांच्या गावातच धोबीपछाड देण्यात यश आलं आहे.

हेही वाचा -

  1. Narvekar Meet President Droupadi Murmu : विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर राष्ट्रपती द्रौपदी मुर्मूंच्या भेटीला
  2. Gram Panchayat Maharashtra Elections २०२३ : बीड जिल्ह्यात राष्ट्रवादी अजित पवार गटाची घोडदौड सुरू, 65 जागांवर आघाडी
  3. Gram Panchayat Election 2023 : जनतेचा कौल महायुतीच्या पारड्यात - केशव उपाध्ये

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.