ETV Bharat / state

Dhangar Reservation : धनगर आरक्षणावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची प्रतिक्रिया; म्हणाले... - Devendra Fadnavid reaction on Dhangar reservation

Dhangar Reservation : गेल्या काही दिवसांपासून राज्यात आरक्षणाचा मुद्दा चांगलाच तापलाय. धनगर आरक्षणाचा प्रश्न सोडवण्यासाठी सरकारनं अतिशय सकारात्मक दृष्टीनं पुढाकार घेतला असून यावर लवकरच मार्ग निघेल, असा विश्वास उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी व्यक्त केलाय.

Dhangar Reservation
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Sep 22, 2023, 9:20 AM IST

Updated : Sep 22, 2023, 9:30 AM IST

धनगर आरक्षणावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मोठी प्रतिक्रीया

पुणे Dhangar Reservation : मराठा आरक्षणानंतर आता धनगर आरक्षणाचा मुद्दा पेटला असून राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली याविषयावर बैठक पार पडली. धनगर आरक्षणाचा प्रश्न सोडवण्यासाठी सरकारनं अतिशय सकारात्मक दृष्टीनं पुढाकार घेतलाय. मुख्यमंत्र्यांनी इतकी सकारात्मक दाखवल्यावर निश्चितच यातून मार्ग निघेल असा विश्वास असल्याचं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी म्हटलंय. राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पुणे दौऱ्यावर होते. यावेळी त्यांनी विविध गणेश मंडळांना भेट देत कसबा गणपती मंडळालाही भेट दिली यावेळी ते बोलत होते. (Devendra Fadnavid reaction on Dhangar reservation)

जेवढे विघ्न आहेत तेवढे दूर व्हावे : यावेळी बोलताना फडणवीस म्हणाले, मी दरवर्षी गणेशोत्सवाला पुण्यात येत असतो. गणेशोत्सवाचं आणि पुण्याचं एक वेगळं नातं आहे. हा जो सार्वजनिक गणेशोत्सव देशभरात पोहोचला त्याची खरी सुरवात पुण्यानं केलीय. म्हणूनच मी मानाच्या गणपती मंडळाची भेट घेत असतो. तो विघ्नहर्ता आहे आणि विघ्न दूर करण्याचं काम विघ्नहर्ता करत असतो, म्हणून त्याच आशीर्वाद हवा असतो. निश्चितच त्यांच आशीर्वाद पुण्याला तसंच महाराष्ट्राला मिळेल, असा विश्वास असल्याचं फडणवीस म्हणाले. जेवढे विघ्न आहेत तेवढे दूर व्हावे हेच बाप्पाला मागणं मागितल्याचं फडणवीस यावेळी म्हणाले.

बच्चू कडूंच्या विधानाशी सहमत नाही : महिला आरक्षणाबाबत बच्चू कडूंनी केलेल्या विधानाबाबत फडणवीस म्हणाले की, जेव्हा महापालिका आणि जिल्हा परिषदेमध्ये आरक्षण दिलं गेलं, तेव्हा देखील लोक अश्याच पद्धतीने बोलत होते. सुरवातीच्या 5 वर्षात पुरुषांच वावर जास्त प्रमाणात होता हे खर असलं, तरी काही काळानंतर महिला सक्षम झाल्यात. आता सर्वकाही महिलाच चालवत आहेत, असं म्हणत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी आमदार बच्चू कडूंच्या विधानाशी सहमत नसल्याचं सांगितलंय.

हेही वाचा :

  1. Muslim Reservation : ...तर आमच्याकडंही 'जरांगे पाटील' आहेत; मुस्लिम आरक्षणावरून 'एमआयएम'आक्रमक
  2. Dhangar Reservation : आरक्षणावरून धनगर समाज आक्रमक; मुख्य कार्यकारी अधिकाऱ्याचे फोडले कार्यालय
  3. Dhangar reservation in Maharashtra: धनगर आरक्षणावरील आजची सुनावणी लांबणीवर, 13 व 14 जुलैला होणार मुंबई उच्च न्यायालयात सुनावणी

Last Updated : Sep 22, 2023, 9:30 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.