पुणे : 2022 संपत आला असून 2023 वर्षांमध्ये अनेक नागरिकांनी नवे संकल्प नव्या आशा आणि नवे स्वप्न घेऊन आज 2023 या वर्षांमध्ये पदार्पण करतानाच पुण्यातील प्रसिद्ध अशा दगडूशेठ गणेशाचे दर्शन घेतलेला आहे मंदिर प्रशासनाकडून रात्री उशिरापर्यंत दर्शन सुरू ठेवण्यात आलेलो होतो कारण ज्या लोकांना नवीन वर्षाची सुरुवात रात्री उशिरा बाराला करायची होती आणि बारा वाजता जर मंदिर परिसरात बघितलं तर मोठ्या प्रमाणामध्ये नागरिकांची दर्शनासाठी गर्दी होती जवळपास फरासखाना पोलीस स्टेशन पासून ते दगडूशेठ मंदिरापर्यंत नागरिकांनी रात्री उशिरापर्यंत थांबून दगडूशेठ दर्शन घेतलेला आहे. (Decorate Bappas idol attractively)
मोठ्या रांगेमध्ये नागरिक दर्शनासाठी : दगडूशेठ गणपती ट्रस्टच्यावतीने रात्री महारथीचे सुद्धा आयोजन करण्यात आलेल होत यामध्ये रात्री बारा वाजता आरती करण्यात आली आणि गणेशाचे दर्शन नागरिकांसाठी खुले करण्यात आले मोठ्या रांगेमध्ये नागरिक दर्शनासाठी दिसत होते. रात्री उशीर होता तरीसुद्धा नागरिकांमध्ये उत्साह होता. नवीन वर्षाच्या स्वागताच्या संकल्प ते आपल्या आवडत्या बाप्पा समोर करण्यासाठी रात्री उशिरा सुद्धा आलेले होते आणि जवळपास साडेतीन-चार वाजेपर्यंत नागरिकांनी गणेशाचे दर्शन घेतलेला आहे. (occasion of farewell to year 2022)
प्रशासनाकडून चोख पोलीस बंदोबस्त : आज सकाळी सुद्धा पाच वाजता मंदिर दर्शनासाठी खुले करण्यात आलेला आहे. नवीन वर्षामध्ये आज सुद्धा दगडूशेठ मध्ये गर्दी सकाळपासूनच आहे. त्यामुळे प्रशासनाकडून चोख पोलीस बंदोबस्त या भागांमध्ये ठेवण्यात आलेला आहे. त्याचबरोबर जे ट्रस्ट आहे, त्या ट्रस्टचे कर्मचारी आहेत आणि ज्या नागरिकांना काल शक्य झाले नाही ते आज रविवार असल्याने आज गर्दी सुद्धा मोठी असते परंतु रविवार आणि विशेष असे नववर्षाचे स्वागत हे दोन्ही एकत्र आल्याने आज सुद्धा दगडूशेठ गणेश मंदिर यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात पुणेकर नागरिक राज्यातील नागरिक दर्शन घेताना दिसत आहेत. (Dagdusheth Halwai Ganapati Temple Pune)
निरोप आणि नवीन सुरवात लाडक्या बाप्पाच्या दर्शनाने : पुणे सरत्या वर्षाला निरोप देत नवीन वर्षाचे स्वागत जंगी स्वरुपात Devotees Ganesh Darshan व्हावे, यासाठी शहरातील सर्वच हॉटेल्स रेस्टॉरंटमध्ये जोरदार तयारी करण्यात आली आहे. असे असले तरी सरत्या वर्षाला निरोप देण्यासाठी पुणेकर नागरिकांनी आज सकाळपासूनच मोठ्या संख्येने श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरात गर्दी केली आहे. सरत्या वर्षाला निरोप आणि नवीन वर्षाची सुरवात आपल्या लाडक्या बाप्पाच्या दर्शनाने व्हावी, यासाठी पुणेकर मोठ्या संख्येने श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरात बाप्पाच्या दर्शनासाठी येत असतात. मुलांमध्ये लहानपणापासून संस्कार रुजावे. वर्षाला निरोप आणि नवीन वर्षाच्या स्वागतासाठी घरातील सर्वच लोकांना घेऊन पुणेकर बाप्पाच्या दर्शनासाठी येत असतात.