पुणे - दरवर्षी संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पावन नगरीत आषाढी वारी सोहळा होत असतो. या सोहळ्यासाठी जगभरातून वारकरी हे आळंदीच येत असतात. हे वारकरी इंद्रायणी काठावर स्नान करुन, माऊलींच्या या सोहळ्यात सहभागी होतात. आज (शनिवार) हा सोहळा होत असताना इंद्रायणी नदी दुथडी भरून वाहत असताना या नदीमध्ये स्नान करण्यासाठी वारकरी मात्र नाही.
कोरोनाच्या संकटामुळे यावर्षी आषाढी वारी सोहळा हा मर्यादित करण्यात आला आहे. त्यामुळे माऊलींच्या या नयनरम्य सोहळ्यात वारकरी सहभागी नाहीत. त्यामुळे अलंकापुरीतून खळखळ वाहणारी इंद्रायणी नदी वारकऱ्यांची आतुरतेने वाट पाहत आहे. मात्र, हा भक्तीचा महिमा आज इंद्रायणी घाटावर दिसत नाही.