ETV Bharat / state

DCM on Akola Ahmednagar Violence : अकोला, अहमदनगर दंगल; देवेंद्र फडणवीसांनी दिला इशारा, म्हणाले, सोडणार नाही... - Ahmednagar Violence

राज्यातील अकोला आणि अहमदनगर जिल्ह्यांमध्ये रविवारी दंगल झाली होती. दोन वेगवेगळ्या गटांमध्ये वाद झाला व नंतर याचे रुपांतर दंगलीत झाले. दंगलींवर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे. जे जाणीवपूर्वक दंगली घडवत आहेत त्यांना आम्ही चांगली अद्दल घडवू, असे फडणवीस म्हणाले आहेत. ते पिंपरी - चिंचवडमध्ये प्रसारमाध्यमांशी बोलत होते. अहमदनगर आणि अकोला दोन्ही जिल्ह्यात सध्या शांतता आहे. तसेच सोमवारी अकोला पोलिसांनी रुट मार्च काढून सुरक्षेचा आढावा घेतला आहे.

Devendra Fadnavis Reaction
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
author img

By

Published : May 15, 2023, 1:47 PM IST

Updated : May 16, 2023, 6:32 PM IST

उपमुख्यमंत्र्यांनी दिला इशारा

पुणे : राज्यातील अकोला आणि अहमदनगर शहरांमध्ये रविवारी दंगली उफाळून आल्या. या दंगलींमध्ये मोठ्या प्रमाणात जाळपोळ झाली असून मालमत्तेचेही बरेच नुकसान झाले आहे. पोलिसांनी सध्या परिस्थिती नियंत्रणात आणली असून गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घटनेच्या चौकशीचे आदेश दिले आहेत.

महाराष्ट्रात कोणालाही दंगली घडवू देणार नाही. जे दंगली घडवण्याचा प्रयत्न करत आहेत, त्यांना आम्ही नक्कीच अद्दल घडवू. ह्या दंगली जाणूनबुजून घडवल्या जात आहेत. याच्यामागे कोणाची तरी फूस आहे. कोणीतरी जाणीवपूर्वक राज्यातील कायदा व सुव्यवस्था बिघडवण्याचा प्रयत्न करत आहे. आम्ही मात्र हे सफल होऊ देणार नाही. हे जे कोणी करत आहे, त्यांना आम्ही सोडणार नाही. दंगलींमध्ये काही लोक आणि संस्था आगीत तेल ओतण्याचा काम करत आहेत. - देवेंद्र फडणवीस, गृहमंत्री

अकोल्यामध्ये दोन गटांत हाणामारी : अकोला शहरात काल सोशल मीडियावरील एका पोस्टवरून दोन गटांमध्ये जातीय तणाव निर्माण झाला होता. त्यानंतर हे दोन गट समोरासमोर आले आणि त्यांच्यात प्रचंड दगडफेक झाली. या घटनेमध्ये दहा जण जखमी झाले असून एकाचा मृत्यू झाला आहे. तसेच अनेक वाहनांचे देखील नुकसान झाले. घटनेनंतर पोलिसांनी मोठ्या प्रमाणात कुमक तैनात केली होती. तसेच राज्य राखीव दलाच्या दोन तुकड्या आणि इतर जिल्ह्यातील पोलिसांचा ताफाही बोलविण्यात आला होता. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलीस अधीक्षक संदीप घुगे यांनी अश्रुधुरांचा वापर करण्याचे तातडीने आदेश दिले होते. त्यासोबतच बंदुकीच्या फैरी झाडण्याचे आदेशही दिले होते. दंगलीनंतर जिल्ह्यात संचारबंदी लागू करण्यात आली आहे. या प्रकरणी आत्तापर्यंत सुमारे 30 जणांना अटक करण्यात आली आहे. सोमवारी रात्री पोलिसांनी शहरत मार्च काढून सुरक्षेचा आढावा घेतला.

शेवगावात दोन गटात वाद

अहमदनगर जिल्ह्यातही दगडफेक : अकोल्यानंतर अहमदनगर जिल्ह्यातील शेवगावमध्ये देखील काल दगडफेकीची घटना घडली. छत्रपती संभाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त काढण्यात आलेल्या मिरवणुकीदरम्यान ही दगडफेक झाली. जमावाने यावेळी वाहनांवरही दगडफेक करुन मोठ्या प्रमाणावर तोडफोड केली. काही दुकानांवरही त्यांनी हल्ला चढवित तोडफोड केली. या घटनेमध्ये बंदोबस्तावर असलेले 4 पोलीस अधिकारी जखमी झाले आहेत. जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला यांनी रात्री घटनास्थळाची पाहणी केली. सकाळी 10 वाजता परत शेवगाव येथे घटनास्थळी भेट देऊन त्यांनी माहिती घेतली. पोलिसांनी या प्रकरणी आत्तापर्यंत 102 जणांवर गुन्हा दाखल केला आहे. तसेच कोणतीही अनुचित घटना घडू नये यासाठी राज्य राखीव पोलीस दलाच्या 2 तुकड्या शेवगावमध्ये तैनात करण्यात आल्या आहेत. घटनास्थळी पोलीस उपअधीक्षक संदीप मिटके यांनी स्वत: दुकानांना लागलेली आग विझविण्याचा प्रयत्न केला. सध्या परिस्थिती नियंत्रणात असून आत्तापर्यंत 50 जणांना ताब्यात घेण्यात आले आहे.

फडणवीसांनी दिले चौकशीचे आदेश : अकोल्यातील घटनेनंतर राज्याचे उपमुख्यमंत्री व गृहमंत्री देवेंद्र फडणवीस रात्रीपासूनच डीजीपी आणि अकोला पोलिसांच्या संपर्कात होते. त्यांनी या घटनांच्या सखोल चौकशीचे आदेश दिल्याची माहिती उपमुख्यमंत्री कार्यालयाने दिली आहे. सध्या दोन्ही ठिकाणी परिस्थिती पूर्णपणे नियंत्रणात असून कायद व सुव्यवस्था पुन्हा स्थापित करण्यात आली आहे.

  1. हेही वाचा : ED Summons Jayant Patil: ईडीने बजावले जयंत पाटील यांना दुसरे समन्स; 29 मे रोजी होणार चौकशी
  2. हेही वाचा : Congress on Karnataka CM : डीके शिवकुमार व सिद्धरामय्या दोन्ही प्रबळ दावेदार.. कर्नाटकचे मुख्यमंत्री कोण होणार?
  3. हेही वाचा : Rahul Gandhi Defamation Case : राहुल गांधींसाठी आजचा दिवस महत्त्वाचा, मोदी आडनाव बदनामी प्रकरणी होणार सुनावणी

Last Updated : May 16, 2023, 6:32 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.