ETV Bharat / state

देवेंद्र फडणवीस पुन्हा मुख्यमंत्री; बारामतीमध्ये भाजप कार्यकर्त्यांचा जल्लोष - Devendra Fadnavis takes oath as CM

आज सकाळी आठ वाजता राजभवनात राज्यपाल भगतसिंह कोशियारी यांनी या दोन्ही नेत्यांना पदाची शपथ दिली. राज्यात स्थिर सरकार यावे म्हणून हा निर्णय घेतला असल्याचे फडणवीस यांनी सांगितले.

बारामतीमध्ये भाजप कार्यकर्त्यांचा जल्लोष
author img

By

Published : Nov 23, 2019, 11:16 AM IST

पुणे - राज्यातले दैनंदिन व्यवहार सुरू असतानाच मोठा राजकीय भूकंप झाला आहे. देवेंद्र फडणवीस यांनी पुन्हा एकदा राज्याचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. तर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. राष्ट्रवादीने अचानक भाजपला पाठिंबा देत सत्तास्थापन केली. त्यामुळे भाजपला पाठिंबा देण्याचा निर्णयामागे शरद पवारांची राजकीय खेळी आहे, की अजित पवार यांचा बंड या चर्चेला उधाण आलं आहे. दरम्यान, बारामतीमध्ये भाजप कार्यकर्त्यांनी जल्लोष साजरा केला आहे.

बारामतीमध्ये भाजप कार्यकर्त्यांचा जल्लोष

आज सकाळी आठ वाजता राजभवनात राज्यपाल भगतसिंह कोशियारी यांनी या दोन्ही नेत्यांना पदाची शपथ दिली. राज्यात स्थिर सरकार यावे म्हणून हा निर्णय घेतला असल्याचे फडणवीस यांनी सांगितले. अजित पवार यांनीही शिवसेनेबरोबरची चर्चा संपत नसल्याने राज्यात सरकार आणण्यासाठी हा निर्णय घेतल्याचे सांगितले.

मात्र, दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेसचे अनेक नेते या निर्णयाबाबत अंधारात असल्याचंही दिसत आहे. सत्तास्थापनेनंतर राष्ट्रवादीच्या अनेक नेत्यांनी या निर्णयाची माहिती नसल्याचं म्हटलं आहे. अजित पवार हे राष्ट्रवादी काँग्रेसचे विधीमंडळ नेते आहेत. त्यामुळे थेट अजित पवार यांनीही पाठिंबा दिला असावा, अशी चर्चा आहे. यावर शरद पवारांनी अजित पवारांच्या या पाठिंब्याला सहमती नसल्याचे सांगितले आहे.

Intro:Body:
बारामती... बारामतीत जल्लोष

निकालानंतर अनेक दिवस सत्तास्थापनेचा पेज प्रसंग कायम होता. वेगवेगळी ध्येय धोरणे असलेली पक्ष एकत्र येत सत्ता स्थापण्याची चर्चा चालू असतानाच
शुक्रवारी संध्याकाळपर्यंत राज्यामध्ये शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे सरकार सत्तेत येईल अशी चर्चा सुरु होती. अचानक शनिवारी सकाळी राज्याच्या राजकारणात मोठा राजकीय खळबळ उडाली झाला. आणि एका रात्रीत भाजपा आणि राष्ट्रवादीने सरकार स्थापन केले आहे.

राज्यातील विधानसभा निवडणुकीच्या निवडणुकीनंतर सत्ता स्थापन होणे अपेक्षित होते. ज्या पक्षाला बहुमत आहे. तो पक्ष हा सत्ता स्थापनेचा दावा करतो. आता पर्यंत अशीच समीकरणे होती मात्र समन्वयाअभावी बहुमत मिळूनही सत्ता स्थापन होऊ शकले नव्हते. आणि त्यामुळे राज्यांमध्ये राष्ट्रपती राजवट लागू झाली. मात्र त्यानंतर अनेक बैठका आणि घडामोडी अनेक चर्चा निर्माण झाल्या आणि मात्र आज राजकारणाने समीकरणं बदलून टाकले आणि थेट राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी आणि भाजप यांची आघाडी करत सत्ता स्थापन केली .त्यामध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज पदाची शपथ घेतली. ही शपथ राज्यपाल भगतसिंग कोशियारी यांनी दिली आहे. हा समारंभ राज्यपाल राजभवनात पार पडला मात्र यानंतर खातेवाटपकडे राज्याचे संपूर्ण लक्ष लागून राहिले आहे. राष्ट्रवादी सत्तेत बसणार असल्याने बारामती मध्ये नवचैतन्य निर्माण झाले आहे आणि जल्लोष पाहायला मिळत आहे.

या निवडणुकीत -राष्ट्रवादीला महाराष्ट्रातील जनतेने विरोधात बसण्याचा कौल दिला होता.. राजकारणात कोण काय करेल किंवा कधी काय होईल हे सांगता येत नाही.. याचाच प्रत्यय आज बहुमत मिळून सत्ता स्थापन न करणाऱ्या भाजप आणि विरोधात बसण्याचा कौल दिलेला राष्ट्रवादी पक्ष एकत्र येत सत्ता स्थापन करत असल्याने वेगळेपण पहावयास मिळत आहे. या निर्णयामुळे विरोधी बाकावरील बसणाऱ्या राष्ट्रवादी पक्षाने आज सत्तेची सूत्रे हाती घेतली असल्याने बारामतीत कार्यकर्त्यांच्या आनंदाचे वातावरण असून फटाके वाजून जल्लोष साजरा करत आहे.

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.