पुणे: छत्रपती शिवाजी महाराज यांचे वंशज उदयनराजे भोसले पत्रकार परिषदेमध्ये भावुक झाले होते. त्यावर आता राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिलेली असून छत्रपतीचे वंशज कधीच हातभल होऊ शकत नाहीत. त्यांच्या योग्य भावना आहेत. त्या आमच्यापर्यंत पोहोचलेले आहेत. परंतु शेवटी राज्यपाल हे संविधानिक पद आहे. त्याचा निर्णय राष्ट्रपती घेऊ शकतात. राज्य सरकार नाही, अशी प्रतिक्रिया उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस Deputy Chief Minister Devendra Fadnavis यांनी दिली आहे.
छत्रपती बद्दल एवढा अपमान का सहन होतोय: उदयनराजे यांच्या पाठीशी आम्ही कायम आहोत. छत्रपती यांचे वंशज कधीच हतबल होऊ शकत नाही. त्यांच्या भावना योग्य ठिकाणी पोहचल्या आहेत. शेवटी राज्यपाल हे पद संविधानिक आहे. त्यांचा निर्णय राष्ट्रपती घेऊ शकतात. यात सरकार काही हस्तक्षेप करू शकत नाहीत. असेही उपमुख्यमंत्री यावेळी म्हणाले. छत्रपती उदयनराजे भोसले यांनी आपली भूमिका मांडण्यासाठी पत्रकार परिषद घेतली. त्यावेळेस त्यांना अश्रू आणावर झाले, छत्रपती बद्दल एवढा अपमान का सहन होतोय. यावर कोणीच का निर्णय घेत नाही, असे ते त्यावेळी म्हणाले होते त्यावर आता उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही प्रतिक्रिया दिलेली आहे.
देशभक्ती राष्ट्रभक्तीचे विचार हे महान: ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले यांच्या निधनानंतर त्यांच्या कुटुंबाचे सांत्वन करण्यासाठी ते पुण्यातील त्यांच्या बावधन निवासस्थानी आले होते. विक्रम गोखले हे अभिनयातील विद्यापीठ होते. त्यामुळे त्यांनी केलेले काम आणि त्यांच्या देशभक्ती राष्ट्रभक्तीचे विचार हे महान होते. त्यांच्या कुटुंबाचे सात्नवन करण्यासाठी मी आलो असल्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यावेळी म्हणाले आहेत.