मुंबई - पुण्यात अतिवृष्टीमुळे पाणी साचून जनजीवन विस्कळीत झाले Life disrupted due to heavy rain in mumbai आहे. पूरस्थितीवरून तोंडसुख घेणाऱ्या भाजपला नागरिकांनी नागपूर आणि पुणे शहराची तुलना करणारे ट्रेंड सुरू झाले आहेत. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस Deputy CM Devendra Fadnavis यांनी असे ट्रेंड चालवणाऱ्यांना लाज वाटली पाहिजे, संतप्त विधान करत ट्रेंडबाजांवर आगपाखड केली. तसेच दरवर्षी मुंबई पाण्यात घालणाऱ्यांना आता मुंबईकर कधीही मुंबई हातात देणार नाहीत, असे वक्तव्य करत पळवाट Comparison of Mumbai Nagpur flood situation काढली. राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर ते प्रसारमाध्यमांशी बोलत होते.
लाज वाटली पाहिजे - ज्या प्रकारे ट्रेंड चालवला जातो आहे. त्यांना लाज वाटली पाहिजे, असा संताप फडणवीस यांनी व्यक्त केला. मुंबई त हजारो कोटी रुपये दरवर्षी खर्च होतात. पुणे नागपूर सारख्या शहरात एकाच वर्षी अशी परिस्थिती उद्भवली आहे. मुंबईत दरवर्षी कोट्यावधी खर्च करूनही, अशी अवस्था होते. मुंबईकर त्यांच्या हातात कधीही आता मुंबई देणार नाहीत असे फडणवीस म्हणाले. यंदा मुंबईत पाणी साचला नाही, असा प्रतिप्रश्न विचारला असता फडणवीस यांनी उत्तर देण्याचे टाळले.